Anjuna Police arrest Dainik Gomantak
गोवा

Margao: मद्यधुंद तरुणाला बेदम मारहाण! गंभीर अवस्थेत उपचारासाठी गोमेकॉत दाखल; 'त्या' पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता

Margao Police case: मडगाव पोलिस स्थानकात आणलेल्या एका युवकाला पोलिसांकडून बेदम मारहाण झाल्याने गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: दारू पिऊन दंगामस्ती करत असल्यामुळे मडगाव पोलिस स्थानकात आणलेल्या एका युवकाला पोलिसांकडून बेदम मारहाण झाल्याने गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले आहे.

एडबर्ग पेरेरा असे या युवकाचे नाव असून, तो नावेली येथील आहे. हे प्रकरण आता पोलिसांना भोवण्याची शक्यता असल्याने पोलिस या घटनेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. या मारहाणप्रकरणी एक उपनिरीक्षक गोत्यात आला असून, त्याच्यावर कारवाई होणार, असे संकेत दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत.

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या घटनेला पुष्टी दिली. याप्रकरणी चौकशी सुरू असून, दोषींवर कायद्यानुसार कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले. बुधवारी रात्री ही घटना घडली. नावेली येथे एकजण दारू पिऊन दंगामस्ती करीत असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्याला मडगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन ठाण्यात आणले.

याबाबत मडगाव पोलिस ठाण्यात चौकशी केली असता, दारूच्या नशेत तो भिंतीवर पडल्याने जखमी झाल्याचे सांगण्यात आले. बुधवारी फातोर्डा येथे फुटबॉल सामना असल्याने बहुतांश पोलिस तेथे तैनात होते. त्यामुळे मडगाव पोलिस ठाण्यात अपुरा कर्मचारी वर्ग होता. दारूच्या नशेत धुंद असलेल्या एडबर्गला आवरणे पोलिसांनाही कठीण होत होते. शेवटी पोलिसांनी त्याला मारहाण केली आणि त्यात तो जखमी झाला, असे सांगण्यात आले.

पीडिताच्या मेंदूत रक्ताच्या गाठी

ठाण्यात आणल्यानंतरही या युवकाने दंगामस्ती करण्यास सुरुवात केली. तसेच पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी केलेल्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. बेशुद्धावस्थेत त्याला गोमेकॉत दाखल केले. तपासणीनंतर त्याच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी असल्याचे निदान झाले, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT