Car Theft Canava
गोवा

Goa Theft: पर्यटक म्हणून आले,गाडी घेऊन पळाले!

Margao Police: मडगाव पोलिसांनी रांजणगाव येथे जाऊन दोघांच्‍या मुसक्‍या आवळल्‍या

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात पर्यटक म्हणून आलेले व भाड्याने गाडी घेऊन महाराष्ट्रात पळून गेलेले जावेद इस्माईल (३३, उत्तराखंड) आणि शान खान (३२, उत्तर प्रदेश) या दोघांच्‍या मुसक्‍या मडगाव पोलिसांनी रांजणगाव येथे जाऊन आवळल्‍या.

मडगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही संशयित दोन दिवसांपूर्वी मडगावात आले होते. त्यांनी मडगाव रेल्वेस्थानकाजवळ उतरून एका व्यावसायिकाकडून ‘रेंट अ कार’ दोन दिवसांसाठी स्वतः चालविण्यास भाड्याने घेतली.

काल त्या दोघांनी काल ही कार मालकाला परत न करता परस्‍पर घेऊन महाराष्ट्राची वाट पकडली. येथे कारमालकाने आपल्या ट्रेकिंग डिव्हायसवर पाहिल्यावर त्याला आपली गाडी घेऊन संशयित महाराष्ट्रात जात असल्याचे दिसून आले. लगेच त्याने मडगाव पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्‍यानंतर पोलिसांचे पथक महाराष्ट्रात रवाना झाले.

सदर गाडी रांजणगाव येथील एका गॅरेजच्या बाहेर पार्क करून ठेवलेली ट्रेकिंग करताना दिसून आल्यावर स्थानिक पोलिसांच्या मदतीने मडगाव पोलिस त्या गॅरेजजवळ पोहोचले व त्‍यांनी संशयितांना ताब्‍यात घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT