Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa News : ओशिया इमारतीमधील लिफ्ट, शौचालये नादुरुस्त

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News :

सासष्टी, मडगाव येथील ओशिया कमर्शियल आर्केड इमारतीमधील एक लिफ्ट कित्येक वर्षे बंद होती. ती हल्लीच सुरू करण्यात आली.

मात्र, येथील दुसरी लिफ्ट आणि शौचालये नादुरुस्त आहेत. जर १५ ऑगस्टपूर्वी लिफ्ट आणि शौचालये दुरुस्त करून स्वच्छ केली नाहीत तर स्वातंत्र्यदिनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी इमारतीसमोर आंदोलनाला बसून निषेध नोंदविला जाईल, असा इशारा महेश नायक यांनी दिला आहे.

या इमारतीमध्ये वाहतूक खाते, नगर नियोजन खाते, एसजीपीडीए या सरकारी कचेऱ्यांमध्ये दररोज शेकडो लोक येत-जात असतात. लिफ्ट बंद असल्याने लोकांना पायऱ्या चढून वर जावे लागते.

इमारतीमधील शौचालयेसुद्धा दुरुस्त करणे आवश्यक आहे. काही लोक इमारतीबाहेरच मूत्रविसर्जन करतात. खरकटे, खाद्यपदार्थ आणून फेकतात. काहीजण रात्री येथे मद्यपान करतात आणि रिकाम्या बाटल्या तेथेच फेकतात. त्यामुळे दुकानदारांना व कचेऱ्यांमधील कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

MP Viriato Fernandes: गोवा आणि गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण! देशाच्या संरक्षण समितीवर कॅ.विरियातो फर्नांडिसांची नियुक्ती

Goa Politics: 'मुख्यमंत्री महोदय 2 लाख नोकऱ्यांबाबत तपशीलवार माहिती द्या...'; कॉंग्रेसचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT