Vehicles|Margao Muncipality
Vehicles|Margao Muncipality Dainik Gomantak
गोवा

Margao Muncipality: विनावापर पडलेल्या वाहनांबाबत मडगाव पालिकेला आली जाग

दैनिक गोमन्तक

Margao Muncipality: मडगाव पालिकेची कित्येक विनावापर वाहने गॅरेजमध्ये सडत असल्याचे वृत्त प्रसिद्धी माध्यमांनी दिल्यावर अखेर काल मडगाव पालिकेला जाग आली. नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी अन्य नगरसेवकांसोबत या गॅरेजमध्ये जाऊन वाहनांची पाहणी केली.

मडगाव नगरपालिकेने जेबीएस-4 इंजिनचे तीन ट्रक घेतले होते. त्यांची नोंदणी करून ते चालविण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करणारे पत्र वाहतूक खात्याला केली असल्याची माहिती शिरोडकर यांनी दिली.

या गॅरेजमध्ये एक शववाहिका विनावापर पडून होती. देखभालीअभावी ती गंजण्याच्या स्थितीत आहे. या गाडीची दुरुस्ती करून ती पुन्हा सेवेत आणावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

प्रशासनाकडून रखडले काम

एक ट्रक आणि दोन रिक्षा या ठिकाणी तशाच पडून होत्या. या तिन्ही वाहनांची दुरुस्ती करून त्यांचाही कामासाठी वापर करण्यात येईल. पालिकेचे दोन ट्रक भंगारात काढले होते. हे ट्रक भंगारात काढण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. केवळ प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हे काम रखडले आहे, असे शिरोडकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT