Margao Municipal Council  Dainik Gomantak
गोवा

मडगाव पालिकेची स्वच्छता मोहीम सुरू

पालिकेचे कर्मचारी शनिवारीपासून कचरा साफ करण्यात गुंतलेले दिसून आले.

दैनिक गोमन्तक

मडगाव : मडगाव पालिकेने कचऱ्याच्या समस्येची गंभीर दखल घेत मडगावच्या रिंग रोडवरील कचरा साफ करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेचे कर्मचारी शनिवारीपासून कचरा साफ करण्यात गुंतलेले दिसून आले.

घरातील सुका व ओला कचऱ्याचे वर्गीकरण न करणार्‍यांना 5,000 रुपये दंड आकारण्याचे स्पष्ट संकेत याआधीच मुख्याधिकारी रोहित कदम यांनी दिले होते. मात्र, नागरिकांनी याची दखल न घेता कचरा टाकणे सुरूच ठेवले.

पत्रकारांशी बोलताना पालिका कर्मचारी रवी नाईक यांनी सांगितले की, रिंगरोडच्या कडेला टाकलेला कचरा त्यांनी साफ केला आहे. "वास्तविक, आम्ही या भागातून नियमितपणे कचरा उचलतो, मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा कचरा आढळतो," नाईक म्हणाले. आजूबाजूच्या गावातील लोक हा कचरा रस्त्याच्या कडेला टाकतात, असा त्यांचा संशय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chit Celebration Ban: IPL मध्ये 'पर्ची सेलिब्रेशन'वरून मोठा राडा! माजी क्रिकेटपटू भडकला, थेट 'BCCI' कडे केली 'ही' मोठी मागणी

Viral video: विदेशी तरूणीनं पहिल्यांदाच खाल्लं भारतीय 'पान'; रिएक्शन पाहून नेटीझन्सना हसू आवरेना, व्हिडिओ व्हायरल!

NEET Paper Leak: आता उघडणार सर्व गुपितं! बॉटनी प्रोफेसर मनीषा मंधारेला 14 दिवसांची 'CBI' कोठडी; मथुरेतून झाली होती अटक

Goa Drowning Death: बुडून मृत्यू की घातपात? कुळे येथील दूधसागर नदीत मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू

Goa House Fire: मयते-अस्नोडा येथे भीषण आग; घराची स्टोअर रूम जळून खाक, 3 लाखांचे सामान भस्मसात

SCROLL FOR NEXT