Goa | Margao Municipality Dainik Gomantak
गोवा

Margao Municipality: मडगाव पालिकेने 43 दिवसात वसुल केली तब्बल 1 कोटींची थकबाकी

मडगाव नगरपालिकेच्या थकबाकी वसुली पथकाने 1 कोटी 2 लाख रुपये 43 दिवसात गोळा करण्यात यश मिळविले

दैनिक गोमन्तक

Margao Municipality: मडगाव नगरपालिकेच्या थकबाकी वसुली पथकाने 1 कोटी 2 लाख रुपये 43 दिवसात गोळा करण्यात यश मिळविले असल्याची माहिती नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी दिली.

काही वर्षांपासून रखडून पडलेली कर थकबाकीची वसुली नगरपालिकेच्या पथकाने नोव्हेंबर 22 मध्ये सुरू केली होती.

मडगाव नगरपालिकेचे विद्यमान नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी नगराध्यक्षपदाचा ताबा घेतल्यावेळी प्रथम थकबाकी वसुली व कचरा नियोजनावर भर दिला होता. या वसुलीत 15 दिवसांच्या काळात चाळीस लाख रुपये नगरपालिकेच्या तिजोरीत जमा झाले

43 दिवसात एक कोटी रुपयांपर्यंतचा टप्पा या थकबाकीने गाठला आहे. थकबाकी वसुलीसाठी नगरपालिलेने विशेष पथक तयार केले आहे. दर दिवशी हे पथक दोन लाखापर्यंतची थकबाकी वसुली करीत आहे.

नगराध्यक्षपदाचा ताबा घेतल्यानंतर प्रथम कर थकबाकी वसुलीवर लक्ष केंद्रित केले होते. या वसुलीला थकबाकीदारांकडून प्रतिसाद लाभत आहे. टप्याटप्याने ही वसुली गोळा करण्यात येत आहे . ही थकबाकी 17 कोटी रुपयांच्या आसपास आहे. या वसुलीसाठी थकबाकीदार असलेल्यांनी सहकार्य करावे.- दामोदर शिरोडकर, नगराध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: 'ओंकार' पोचला उगाडे - सिंधुदुर्गात... सीमोल्लंघन सुरूच; पेडणे वन कर्मचाऱ्यांना तूर्त दिलासा

8th Pay Commission: पगारवाढीचा 'सुपर धमाका'! रिटायरमेंट फंड आणि एरियरबाबत मोठी अपडेट; बेसिक सॅलरी किती वाढणार?

गोव्‍यात धार्मिक कलह माजवू पाहणाऱ्या संघटनांवर बंदी घाला! चर्चिल यांची मागणी; गौतम खट्टर विराेधात पोलिस तक्रार

गौतम खट्टरला 48 तासांत अटक करा! सासष्टीत वातावरण तप्त; आप, कॉंग्रेससह सामाजिक कार्यकर्त्यांची तक्रार

IPL Points Table: मुंबई इंडियन्सचं जबरदस्त 'कमबॅक'! गुजरातला धूळ चारुन गुणतालिकेत घेतली मोठी झेप; चेन्नईसह तीन संघांना फटका

SCROLL FOR NEXT