Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Margao Accident: मडगावात भीषण अपघात! कोकण रेल्वे स्टेशनजवळ दुचाकींच्या धडकेत पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू; आरोपी फरार

Parshuram Talwar Death: मडगाव येथे रविवारी (2 नोव्हेंबर) मध्यरात्री कोकण रेल्वे स्थानकाजवळ दुर्दैवी अपघात झाला.

Manish Jadhav

Margao Municipal Driver Dies: मडगाव येथे रविवारी (2 नोव्हेंबर) मध्यरात्री कोकण रेल्वे स्थानकाजवळ दुर्देवी अपघात झाला. या अपघातात परशुराम तलवार (वय 38) या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. परशुराम हा मडगाव नगरपालिकेत चालक (Driver) म्हणून कार्यरत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा परशुराम हा आपल्या मोटारसायकलवरुन जात असताना, समोरुन येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने त्याच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, परशुराम गंभीररित्या जखमी झाला.

अपघातानंतर त्याला तातडीने साऊथ गोवा जिल्हा रुग्णालयात (South Goa District Hospital) दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना गोवा मेडिकल कॉलेज (Goa Medical College) येथे हलवण्यात आले. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान परशुरामचा मृत्यू झाला.

या अपघाताला (Accident) कारणीभूत असलेल्या दुसऱ्या दुचाकीस्वाराचा शोध पोलीस घेत आहेत. अपघातानंतर तो दुचाकीस्वार घटनास्थळावरुन फरार झाला. मडगाव पोलीस या घटनेची नोंद करुन पुढील तपास करत आहेत. परशुरामच्या निधनाने मडगाव नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांमध्ये आणि त्याच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

SCROLL FOR NEXT