Wifi Scam  Canva
गोवा

Maragao WiFi Scam: नगराध्यक्ष आणि माजी मुख्याधिकारी यांचे एकमेकावर आरोप; वायफाय बिलाचे गूढ कायम

Margao Municipal Council: वायफाय बिलासंदर्भात नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर व माजी मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांची मते वेगवेगळी

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: वायफाय बिलासंदर्भात नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर व माजी मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांची मते वेगवेगळी असल्याने या प्रकरणी गूढ अजूनही कायम आहे. या बिलासंदर्भात दोघेही एकमेकावर आरोप करीत आहेत व दोष देत आहेत.

माजी मुख्याधिकारी शंखवाळकर सांगतात की, योगेश शेटकरने सांगितल्याप्रमाणे आपण हे पैसे त्याला दिले असे कॅशिअरने आपल्याला सांगितले. तरीही आपण कॅशिअरला मेमो दिला आहे, कारण यात कॅशिअरची सुद्धा चूक आहे. आम्ही वायफाय रेल इंडिया या रेल्वे कंपनीकडून घेतल्याचे माजी मुख्याधिकारी सांगतात.

नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी सांगितले की, मुख्याधिकाऱ्यांनी पैसे योगेशला द्यायला सांगितले होते, असे कॅशिअरने आपल्याला सांगितले. शिवाय ज्या कंपनीकडून वाय फाय सेवा घेतली ती कंपनी सुद्धा बोगस असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.

खरा कोण...?

नगराध्यक्षांनी सांगितले की, मुख्याधिकारी असताना शंखवाळकर यांनी नगरपालिकेत अनेक गैरप्रकार करून ठेवलेले आहेत. काहीजणांनी त्यांच्या विरोधात दक्षता खात्याकडे तक्रारही केली आहे. आपले त्यांच्याकडे काहीही वैर नसून केवळ मुख्याधिकारी म्हणून त्यांची भूमिका चुकीची होती हेच आपल्याला सांगायचे आहे. साडेसतरा लाख रुपयांच्या गैरप्रकाराबाबत बोलताना नगराध्यक्षांनी सांगितले की, योगेश शेटकरकडून ही सर्व रक्कम वसूल केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. अतिरिक्त ताबा असलेले मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांना सुद्धा या प्रकरणी कारवाई करण्यास सांगणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT