Margao Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Margao: मी शपथ घेतो की, 'पंधरा दिवसांत मडगाव चकाचक करणार'; पालिकेचे स्वच्छता ही सेवा अभियान

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Municipal Council

सासष्टी: ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाअंतर्गत पुढील पंधरा दिवसांत सर्व प्रभाग स्वच्छ करण्याची शपथ मडगाव नगरपालिकेने घेतली आहे. सर्व नगरसेवकांशी चर्चा करून व त्यांना विश्‍‍वासात घेऊन हा निर्णय घेण्‍यात आला आहे.

प्रत्येक प्रभागांमध्ये स्वच्छतेसाठी मजूर पाठविले जातात. ही पद्धत तात्पुरती बंद ठेवण्यात येईल, जेणेकरून सर्व मजूर व वाहने संपूर्ण शहराच्या स्वच्छतेसाठी गुंतविले जातील.

याबाबत बोलताना नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी सांगितले की, स्वच्छता मोहीम यापूर्वीच सुरू झाली आहे. नगरपालिका बाग, शहरातील जलस्त्रोत, गणपती विसर्जन ठिकाणे स्वच्छ करण्यात आली आहेत.

नगरपालिका मार्केटमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेतली जाईल. त्याचप्रमाणे शहरातील शाळा व महाविद्यालयांमध्येही ही मोहीम राबवली जाईल. याच अभियानाअंतर्गत नगरपालिकेतर्फे वैद्यकीय शिबिर आयोजित केले जाईल असेही नगराध्‍यक्ष शिरोडकर यांनी सांगितले.

दरम्‍यान, सर्व नगरसेवक, कर्मचारी व मुख्याधिकारी अजित पंचवाडकर शपथ घेण्याच्या या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

एकजुटीने समस्या मांडत राहू : नायक

मडगावचा आवाज ऐकून अखेर अधिकाऱ्यांना जाग आल्यासारखे दिसत आहे. ही फक्त एक सुरूवात आहे. एकजुटीने आमच्या समस्या मांडत राहू आणि चुकीच्या कृत्यांसाठी जबाबदार असलेल्या सर्वांना जाब विचारू.

चला जागृत राहून मडगावला सुरक्षित, स्वच्छ आणि हरित शहर म्हणून बदलण्यासाठी काम करूया, असे आवाहन युवा नेते प्रभव नायक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT