Margao Municipal Council confiscated illegally fish  Dainik Gomantak
गोवा

Margao: एसजीपीडीए मार्केटबाहेरील अवैध मासळी मडगाव नगरपरिषदेकडून जप्त

जवळपास दहा हजार किलो मासळी जप्त केल्याची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: एसजीपीडीए मार्केटबाहेर (SGPDA Market) विकली जाणारी मासळी अवैध मासळी मडगाव नगरपरिषदेकडून (Margao Municipal Council) जप्त करण्यात आली आहे. परप्रांतीयांकडून बेकायदेशीर मासळी विक्री (Fish) होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मडगाव नगरपरिषदेने जवळपास दहा हजार किलो मासळी जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एसजीपीडीए मार्केट परिसरात परप्रांतीयांकडून अवैध मासळी विक्रीवर मडगाव नगरपरिषदेने करवाई करत हजारो किलो मासळी जप्त केली. परराज्यातून आलेली ही मासळी खाण्यालायक नसल्याचे नगरपरिषदेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. जवळपास दहा हजार किलो मासळी असल्याचा अंदाज असून, ती सोनसोडा येथे टाकली जाईल. असे अधिकारी म्हणाले.

दरम्यान, मडगाव नगरपरिषदेच्या (Margao Municipal Council) अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यानंतर परप्रांतीय नागरिक आणि अधिकारी यांच्यात किरकोळ वाद झाल्याचे व्हिडिओ समोर आला आहे. तर, मार्केटमधील पारंपारिक मासळी विक्रेत्यांनी नगरपरिषदेने केलेल्या कारवाईचे स्वागत करत, आभार मानले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT