Margao News Dainik Gomantak
गोवा

Margao News : 'वंदे भारत’ मुंबईला पोहोचली 11 तासांत; आजपासून नियमित सेवा सुरू

आठवड्यातून तीन दिवस धावणारः बबन घाटगे

गोमन्तक डिजिटल टीम

Margao : देशातली पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन असलेली मडगाव-मुंबई दरम्यानची शुभारंभाची गाडी काल रात्री ९ वाजता म्हणजे १० तासांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दाखल झाली. परतीची गाडी दुपारी मुंबईहून सुटून सायंकाळी मडगाव स्थानकावर दाखल झाली.

आजपासून मडगाव - मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची नियमित सेवा सुरू झाली असून आता आठवड्याला तीन वेळा धावणार आहे.काल सकाळी ११ वाजता शुभारंभाची गाडी मडगाव रेल्वे स्थानकावरून सुटली होती. रात्री ९ वाजता मुंबईला ती पोहोचली, अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.

मुंबई सीएसएमटी येथून दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी ५:२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३:३० वाजता मडगावला पोहोचेल. दुसऱ्या दिवशी म्हणजे दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दुपारी १२:२० वाजता मडगावहून सुटणार असून आणि त्याच दिवशी रात्री १०:२५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.

नोव्हेंबरपासून सहा दिवस

१ नोव्हेंबरपासून आठवड्यातून ६ दिवस चालेल. ही ट्रेन दादर, ठाणे, पनवेल, खेड रत्नागिरी, कणकवली आणि थिवी येथे थांबेल. एकूण ०८ डब्यांच्या या गाडीचे- डीटीसी- ०२, चेअर कार - ०५ तर एक्झक्युटिव्ह चेअर कार - ०१ अशी रचना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT