Goa News| Dainik Gomantak
गोवा

Goa News: सोनसोडोत कब्रस्तानला दिलेल्या जागेवरून तापले राजकारण

सोनसोडो येथे 30,191 चौरस मीटर जागा मडगावच्या जामिया मशिदीला कब्रस्तानसाठी दिल्यावरून राजकारण तापले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: सोनसोडो येथे 30,191 चौरस मीटर जागा मडगावच्या जामिया मशिदीला कब्रस्तानसाठी दिल्यावरून राजकारण तापले आहे. 2010 साली जेव्हा सध्याच्या शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो नगराध्यक्ष होते.

तेव्हा ही जागा तिन्ही समाजांना दफनभूमीसाठी द्यावी, असा ठराव मंजूर झाला होता. मात्र, ही जागा केवळ कब्रस्तानसाठी देणे कितपत योग्य आहे, असा प्रश्र्न उपस्थित होत आहे.

2010 साली वरील ठरावाबरोबर आके येथील 99,513 चौरस मीटरची जागा पालिकेने सामाजिक प्रकल्पांसाठी संपादन करावी, असा ठरावही मंजूर केला होता. पालिकेने पहिल्या ठरावानुसार सोनसोडो येथील जागा संपादन केली.

पण आके येथील जागा संपादन करण्यास रस दाखविला नाही. सोनसोडो येथील जागा संपादन करताना जो उद्देश होता त्याकडे डोळेझाक करीत पालिकेने 2011साली ही जागा जामिया मशिद, मालभाटकडे सुपुर्द केली.

त्यानंतर अजूनपर्यंत या जागेवर कब्रस्तान बनविणे बाकीच राहिले. आता जामिया मशिदला ही जागा हवी आहे व नगरपालिकेने ती परत एकदा त्यांना देऊ केली आहे. मात्र, नागरिकांनी त्यास आक्षेप घेतला आहे.

अधिकाऱ्यांसमोरही नागरिकांची निदर्शने

हल्लीच राय, फातोर्डा, नावेली, आर्ले येथील नागरिकांनी ही जागा तिन्ही समाजांना दफनभूमीसाठी द्यावी, अशी मागणी केली आहे. दोन दिवसांपूर्वी या जागेचे सर्वेक्षण करण्यास आलेल्या अधिकाऱ्यांसमोरही नागरिकांनी निदर्शने केली.

नगरपालिकेच्या निर्णयाकडे लक्ष

2010साली नगरपालिकेने घेतलेल्या ठरावाविरुद्ध नगरपालिका कशी जाऊ शकते, असा प्रश्र्न नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी उपस्थित केला आहे. ब्लेझ मोता यांनी यासंदर्भात न्यायालयात हस्तक्षेप याचिका सादर केली आहे.

मडगाव नगरपालिकेने ही जागा सर्व तिन्ही समाजांना देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आल्याचे मोता यांनी सांगितले आहे. आता हे प्रकरण न्यायालयात असल्याने नगरपालिका काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT