Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: इन्स्टाग्रामवर मैत्री करणं पडलं महागात, पाजीफोंड येथील 24 वर्षीय युवतीला 3.30 लाखांचा चुना; आरोपी गजाआड

Fraud on Instagram: अगोदर इन्स्टाग्रामवर मैत्री करून नंतर एका २४ वर्षीय युवतीला ३.३० लाखांना गंडा घालण्याची घटना मडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाजीफोंड येथे घडली.

Sameer Amunekar

मडगाव: अगोदर इन्स्टाग्रामवर मैत्री करून नंतर एका २४ वर्षीय युवतीला ३.३० लाखांना गंडा घालण्याची घटना मडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाजीफोंड येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी साई सुनील दळवी (२८) या युवकाला अटक केली आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे.

ममता जयसिंग राजपूत ही युवती तक्रारदार असून, संशयित कुडचडे येथील मोरायले येथील आहे. चालू वर्षाच्या ४ ते १६ एप्रिलदरम्यान ही फसवणुकीची घटना घडली होती. संशयित साई याने तक्रारदार युवतीशी इन्स्टाग्रामवरून मैत्री केली.

नंतर तिला मोठ्या रकमेचे आमिष दाखवून आपल्या व अन्य पाच जणांच्या बँक खात्यांवर रक्कम भरण्यास सांगितली. त्या युवतीने ती रक्कम भरली. मात्र मागाहून आपण फसविले गेल्याचे समजातच तिने पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली.

त्‍यानुसार पोलिसांनी संशयिताला अटक केली. त्‍याच्‍याविरोधात भारतीय न्‍यायदंड संहितेच्या कलम ३१८ (४) व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) नुसार गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक सूरज सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT