Margao Garbage Issue File Photo
गोवा

Margao Garbage Problem: किरकोळ मासळी मार्केट शेजारी कचऱ्याचे ढीग; रहिवासी हैराण

दैनिक गोमन्तक

Margao Garbage Problem: गोव्यात ठिकठिकाणी कचरा समस्येमुळे नागरिक हैराण झाले आहेत. मडगावमधील किरकोळ मासळी मार्केटच्या शेजारीच मासे वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक, थर्माकोलच्या पेट्या, बांबूच्या टोपल्या अशा प्रकारच्या कचऱ्याचे ढीग शेतात टाकण्यात आल्याने मडगाव येथील रहिवाशांना याचा नाहक त्रास होत आहे.

कचरा जवळच असलेल्या शेतात वाहून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाळ्यात पावसाच्या पाण्यासोबत हा कचरा इतर ठिकाणी वाहून जाऊन सर्वत्र दुर्गंधी निर्माण होऊ शकते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कचऱ्याची समस्या सोडवावी, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.

मासे विक्रेते आणि मासळीशी संबंधित व्यवसाय करणारे सर्वजण निष्काळजीपणे इथे कचरा टाकत आहेत. आत्ताच तो उचलला गेला नाही तर तो नक्कीच जवळपासच्या सर्व भागात आणि भातशेती आणि जलकुंभांमध्ये वाहून जाईल, अशी आम्हाला भीती वाटते, असे जॉन्सन फर्नांडिस म्हणाले.

किरकोळ मासळी बाजाराला नियमित भेट देणारे आणखी एक नागरिक एस. शेख म्हणाले की, दक्षिण गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरण (SGPDA) चे अध्यक्ष आणि सदस्य सचिव यांनी या भागाची पाहणी करून तातडीने यावर कारवाई सुरू करावी.

या कचऱ्यामुळे परिसर दुर्गंधीयुक्त बनला आहे. या कचऱ्याच्या ढीगावरुन हे लक्षात येते की, या भागात बराच काळ कोणीही फिरकले नाही. अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले तर पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होईल, असे सांगण्यात येत आहे.

एकंदरीत परिस्थिती पाहता, काही प्रमाणात कचरा जवळच्याच भात शेतीत गेला आहे. जर तो वेळीच उचलला नाही तर तो सगळीकडे पसरायला वेळ लागणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT