Viriato Fernandes Dainik Gomantak
गोवा

Margao District Hospitals : जिल्हा रुग्णालयाचे खासगीकरण रद्द करणार : विरियातोंचे आश्वासन

Margao District Hospitals : सरकार कार्यक्रमांच्या आयोजनावर करोडो रुपये खर्च करत असताना सरकारला अत्यंत आवश्यक असलेले आयसीयू, कॅथ लॅब आणि न्यूरो सर्जरी युनिट का सुरू करता आले नाही, याचे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी द्यावे.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao District Hospitals :

मडगाव, : भाजप सार्वजनिक आरोग्य सेवा क्षेत्राचे खासगीकरण करण्‍याच्‍या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तसे झाल्‍यास गोव्‍यातील गरीब जनतेला उपचार मिळणे कठीण होणार आहे असा आरोप काँग्रेस पक्षाने केला असून काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ सरकारकडेच राहील आणि तेथे आयसीयू, कॅथ लॅब, न्यूरो सर्जरी युनिट त्वरित केले जाईल असे कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी प्रसिद्धीस दिलेल्‍या पत्रकांत म्हटले आहे.

सरकार कार्यक्रमांच्या आयोजनावर करोडो रुपये खर्च करत असताना सरकारला अत्यंत आवश्यक असलेले आयसीयू, कॅथ लॅब आणि न्यूरो सर्जरी युनिट का सुरू करता आले नाही, याचे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी द्यावे. भाजप सरकारने गेल्या ११ वर्षात गोव्यातील विविध कार्यक्रमांवर जवळपास एक हजार कोटी रुपये खर्च केले आहेत, असा दावा फर्नांडिस यांनी केला आहे.

खासगी वैद्यकीय महाविद्यालय स्थापून दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे खासगीकरण करण्याच्या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कॅ. फर्नांडिस यांनी आरोग्य मंत्र्यांचे वक्तव्य म्हणजे येणाऱ्या काळात भाजप गरीब लोकांकडून मोफत आरोग्य सेवा हिसकावून घेणार आहे.

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचा प्रकल्प लोकांना परवडणारी आरोग्य सेवा देण्यासाठी काँग्रेसने सुरू केला होता. २०१२ मध्ये सदर इस्पितळाचे बांधकाम जवळपास ७० टक्के पूर्ण झाले होते, परंतु उर्वरित ३० टक्के काम पूर्ण करण्यासाठी भाजप सरकारला ८ वर्षे लागली, असेही फर्नांडिस यांनी स्पष्ट केले.

धोक्याची घंटा

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे आजचे वक्तव्य दक्षिण गोव्यासाठी धोक्याची घंटा आहे. दिल्लीत भाजपची सत्ता आल्यास आरोग्य सेवा सुविधांचेही खासगीकरण केले जाईल आणि प्रत्येक उपचारासाठी शुल्क आकारले जाईल, असे त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT