Margao Civil Hospital Dainik Gomantak
गोवा

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Margao Civil Hospital: मडगावमधील नागरी आरोग्य केंद्र आता दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातून कार्यरत राहणार आहे. मडगावमधील नागरी आरोग्य केंद्राची वारसा इमारतीची परिस्थिती भीतीदायक आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Civil Hospital Merges with South Goa District Hospital

सासष्टी: मडगावमधील नागरी आरोग्य केंद्र आता दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातून कार्यरत राहणार आहे. मडगावमधील नागरी आरोग्य केंद्राची वारसा इमारतीची परिस्थिती भीतीदायक आहे. सरकारतर्फे दुरुस्त करण्याची चिन्हेसुद्धा दिसत नाहीत. नागरी आरोग्य केंद्रात काम करणारे डॉक्टर, इतर कर्मचारी वर्ग तसेच रुग्णांना सुद्धा या इमारतीच्या स्थितीबद्दल भीती वाटत असल्याने येथील कामकाज दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात हलविण्यात आले आहे.

जुनी हॉस्पिसियो इमारतीची सुद्धा दयनीय स्थिती असल्याने नागरी आरोग्य केंद्राचे काम तिथून करणे सुद्धा योग्य नसल्याचे दिसून आले आहे. ८ जुलै २०२३ रोजी नागरी आरोग्य केंद्राच्या इमारतीचा दर्शनी भिंत कोसळली होती. त्यानंतर काही काळ हॉस्पिसियो इस्पितळात कामकाज हलविण्यात आले होते.आता लोकांना ओपीडी व लसीकरणासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात जावे लागेल.

या वारसा इमारतीची दुरुस्ती आवश्यक आहे. १६ महिने झाले तरी कोसळलेली भिंत का दुरुस्त केली जात नाही, हे कळत नसल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

कर्मचारी व रुग्णांच्या सुरक्षेसाठीच येथील कामकाज जिल्हा इस्पितळात हलविले आहे, असे या कर्मचाऱ्याने सांगितले. या वास्तूची दुरुस्ती करणे गरजेचे आहे,असे बोलले जाते.

नागरी आरोग्य केंद्राची वास्तू पाडणार?

नागरी आरोग्य केंद्राची तसेच जुन्या हॉस्पिसियोच्या इमारती पूर्णपणे जमीनदोस्त करून तिथे नवीन इमारत बांधण्याचा सरकारचा इरादा असल्याचे बोलले जाते. आरोग्य मंत्र्यांनी मडगावात नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे नवीन इमारत बांधून तिथे हे महाविद्यालय सुरू करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच असुरक्षित इमारती जमीनदोस्त करण्याचीही सरकारची योजना आहे. या असुरक्षित इमारतीत नागरी आरोग्य केंद्र तसेच हॉस्पिसियो इमारतींचा समावेश असल्याचे कळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT