Madkai Health Centre renovation project Dainik Gomantak
गोवा

Health Centre Renovation: मडकई आरोग्य केंद्राचा चेहरामोहरा बदलणार! 30 कोटींच्या खर्चातून मिळणार अद्ययावत सुविधा

Goa Health Centre 30 Crore Project: राजीनवाडा-गावणे येथील राज्य सरकारच्या आयुष्मान आरोग्य मंदिराचे आज दसऱ्याच्या मुहूर्तावर रविवारी उद्घाटन करण्यात आले.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा: मडकई मतदारसंघातील नागरिकांना आरोग्याच्या अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी मडकईतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे नूतनीकरण करताना या इस्पितळात अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यासाठी ३० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

राजीनवाडा-गावणे येथील राज्य सरकारच्या आयुष्मान आरोग्य मंदिराचे आज दसऱ्याच्या मुहूर्तावर रविवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी सुदिन ढवळीकर बोलत होते. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, माधवराव ढवळीकर ट्रस्टचे विश्वस्त मिथिल ढवळीकर, सरपंच चित्रा फडते, इराज्मो आगियार, पंचसदस्य व्यंकटेश गावडे तसेच इतर पंचसदस्यांसह आरोग्याधिकारी डॉ. स्मिता पार्सेकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

मिथिल ढवळीकर म्हणाले की, माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे आरोग्यविषयक अनेक उपक्रम आखले जातात. त्यातून नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्राधान्य दिले जाते. गणपत नाईक, चित्रा फडते तसेच इराज्मो आगियार यांनीही आपले विचार व्यक्त करताना नवीन आरोग्यविषयक सुविधेबाबत आनंद व्यक्त केला. स्वागत डॉ. स्मिता पार्सेकर यांनी, तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. शुक्ला कामत यांनी केले.

पडिक शाळा इमारतीचा केला वापर!

गावणे येथील सरकारी प्राथमिक शाळेची वास्तू बंद होती. विद्यार्थ्यांना इतर शाळा-वस्त्यांमध्ये पालकांनी घातल्यामुळे ही सरकारी प्राथमिक शाळा बंद करावी लागली होती. या बंद शाळेचा वापर येथे आयुर्वेदिक आयुष्मान आरोग्य केंद्र उभारण्यासाठी करण्यात आला. त्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच आरोग्यमंत्र्यांचे खूप मोठे सहकार्य लाभल्याचे सुदिन ढवळीकर म्हणाले.

साकव बांधकामाला प्रारंभ

गावणे येथील जीर्ण झालेला छोटा साकव पाडून त्याजागी अडीच मीटर रुंदीचा साकव तसेच संरक्षक भिंत बांधकामाचाही शुभारंभ दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला. सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते या कामाला प्रारंभ झाला. सुमारे बारा लाख रुपये खर्चाच्या या कामामुळे स्थानिकांना सोयीस्कर ठरणार असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Betoda Nirankal Pollution: निरंकालच्या नागरिकांना दिलासा? औद्योगिक दुर्गंधीत घट, सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले

Panaji Theft Case: पणजीत चोरट्यांचा धुमाकूळ! पार्क केलेल्या कारची काच फोडून 'इतक्या' हजारांच्या रोकडसह PMLA खटल्यांचे पुरावे लंपास

Electric Scooter Fire Betim: चार्जिंगला लावलेली ईव्ही दुचाकी अचानक पेटली; कार आणि बुलेटचेही लाखोंचे नुकसान!

SBI Cyber Attack: देशातील सर्वात मोठ्या बँकेवर सायबर हल्ला! 3897 ग्राहकांचा प्रायव्हेट डेटा डार्क वेबवर लीक; तुमचा डेटा सुरक्षित आहे का?

Goa Pharma Export Hub: गोवा बनणार औषध निर्यातीचे नवे केंद्र? मोपा-दाबोळी विमानतळांवर मोठी तयारी!

SCROLL FOR NEXT