Marcel Purnima Jatrotsav Dainik Gomantak
गोवा

Malini Purnima Jatrotsav: मालिनी पौर्णिमा जत्रोत्सव सुरू! जत्रेत दुकाने व खरेदीची लगबग; दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Marcel Purnima Jatrotsav: जत्रोत्सवाच्या निमित्ताने श्री देवकीकृष्ण संस्थान तसेच श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवस्थानात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

खांडोळा: माशेल येथे पारंपरिक श्री मालिनी पौर्णिमा जत्रोत्सवास भक्तिभावपूर्ण वातावरणात शनिवार ३ रोजी प्रारंभ झाला आहे. जत्रोत्सवाच्या निमित्ताने श्री देवकीकृष्ण संस्थान तसेच श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवस्थानात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. संध्याकाळी भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.

जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री देवकीकृष्ण देवस्थान परिसर तसेच आसपासच्या भागात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. देवस्थान समितीच्या वतीने भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून दर्शन व्यवस्थेसाठी स्वयंसेवक व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शन प्रक्रिया सुव्यवस्थित पार पडत असल्याचे दिसून येत आहे.

शनिवारी रात्री श्री देवकीकृष्ण, श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवी, तसेच श्री पिसो रवळनाथाच्या दर्शनसाठी भाविकांची रांग लागली होती. विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल, खेळणी, भांडी, पूजेचे साहित्य तसेच दैनंदिन वापराच्या वस्तूंची दुकाने मोठ्या संख्येने उभारण्यात आली आहेत.

या दुकानांवर खरेदीसाठी भाविक व नागरिकांची गर्दी होत असून विशेषतः कुटुंबांसह आलेल्या भाविकांचा सहभाग लक्षणीय आहे. जत्रोत्सवाच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम, आरती, नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविक या जत्रोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होत असून मालिनी पौर्णिमा जत्रोत्सवाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT