Thomas Stephens Konknni Kendr Dainik Gomantak
गोवा

चारशे वर्षे जुन्या हस्तलिखितांची आजही भुरळ

ख्रिस्तपुराणाने मराठीप्रेमी भावूक : फा. स्टीफन्स केंद्राने जपला मराठीचा अनमोल ठेवा

Anil Patil

अभंग आणि ओव्यांच्या रसाळ मराठीचा सतराव्या शतकाचा काळ. तेव्हा भक्ती आणि भाषेचा संगम घडवत संत-महंत मंडळी मराठी परंपरेची बीजे जनमानसात रुजवत होती. हीच मराठी सातासमुद्रापार आलेल्या फादर स्टीफन्स या अवलियाने आत्मसात केली.

चारशे वर्षांपूर्वी मराठीच्या उज्ज्वल परंपरेला कुर्निसात करत त्यांनी ख्रिस्तपुराणाची रचना केली. आजही हे ख्रिस्तपुराण मराठीप्रेमींच्या मनाचा ठाव घेते. पर्वरीतील  फादर  स्टीफन्स  केंद्रात या हस्तलिखितांच्या स्पर्शासाठी रसिकांची पावले वळतात.

जैसी हरळांमाजि रत्नकळा

कि रत्नामाजि हिरा निळा

तैसी भाषांमाजि चोखळा

भाषा मराठी

या एकनाथकालीन अभंगाच्या ओळी..अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या मराठीचं सार्थ वर्णन करतात. रचनाकाराची भाषेबद्दलची आत्मियता प्रत्येक शब्दातून स्पष्ट होते. पण यांचा रचनाकार कुणी मराठमोळा संत नाही.

सतराव्या शतकाच्या सुरुवातीला ख्रिस्तप्रसारासाठी भारतात दाखल झालेले आणि ऑक्‍सफर्ड विद्यापीठात शिकलेले धर्मगुरु फादर स्टीफन्स यांच्या या ओळी आहेत. संवादाची साधने नसताना, भाषा शिकवण्यासाठी मध्यस्थांची वाणवा आणि पूर्णतः नवखा मुलूख, अशा स्थितीतही फादर स्टीफन्स यांनी मराठी आत्मसात केली आणि या भाषेची महती तिच्याच लेकरांना जाणवून दिली.

फादर स्टीफन्स यांनी इ.स.1616 मध्ये हे महाकाव्य मुद्रित केले. पण जगात आज कोठेही त्याची मूळ मुद्रित प्रत उपलब्ध नाही. अखेर 1907 मध्ये फादर स्टीफन्स यांची सर्व हस्तलिखिते मिळवून जोसेफ साल्ढाना यांनी मंगळुरू येथे ख्रिस्तपुराण प्रकाशित केले.

तब्बल 10,962 ओव्यांचे रोमी मराठीतील हे महाकाव्य देवनागरीत अवतरण्यासही तीन शतके उलटली. ख्रिस्तपुराणाची देवनागरीतील प्रत आज सहज उपलब्ध आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

SCROLL FOR NEXT