Bicholim News Dainik Gomantak
गोवा

Bicholim News: मराठी ही विचार, संस्कारक्षम भाषा : प्रभुदेसाई

गोमंतक मराठी अकादमी आणि आयडियल हायस्कूल पिळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

मराठी भाषा ही विचार, आचार आणि संस्कार देणारी भाषा आहे, असे प्रतिपादन विठ्ठल प्रभूदेसाई यांनी पिळगाव येथे एका बोलताना केले. गोमंतक मराठी अकादमी आणि आयडियल हायस्कूल पिळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री. प्रभुैदेसाई प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

आयडियल हायस्कूलच्या डॉ. राममनोहर लोहिया सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला पंच सदस्या शर्मिला वालावलकर, ॲड. अजय प्रभूगावकर, गोमंतक मराठी अकादमी डिचोली प्रभागचे अध्यक्ष सोमनाथ पिळगावकर, आयडियलचे संस्थापक रामचंद्र गर्दे, मुख्याध्यापक ज्ञानेश्र्वर गावकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी नृत्य, नाटिका, कविता, वेशभूषा, गीत, तबला वादन आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. तसेच शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक सोमनाथ पिळगावकर यांनी केले. शर्मिला वालावलकर, ॲड. अजय प्रभुगांवकर, रामचंद्र गर्दे यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन संजना पाळणी यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT