Goa local news Marathi Dainik Gomantak
गोवा

Goa News: म्हादई प्रकल्पाला विलंब झाल्याबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिला केंद्राला दोष

Marathi Breaking News Today: मराठीमध्ये जाणून घ्या गोव्यातील ताज्या घडामोडी

Akshata Chhatre

म्हादई प्रकल्पाला विलंब झाल्याबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिला केंद्राला दोष

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हादई प्रकल्पाला विलंब झाल्याबद्दल केंद्राला दोष दिला आहे.बेळगाव येथे झालेल्या बैठकीत सिद्धरामय्यानी सांगितलं की केंद्र गोव्याच्या राजकारणामुळे कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी देण्यास विलंब करत आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींना राजकीय परिणामांची भीती वाटत असल्याचा आरोप केला.

दीपक तिरकी खून प्रकरणी संशयीताला १० दिवसांची कोठडी  

कोडार - बेतोडा येथे सोमवारी रात्री दीपक तिरकी (२७, झारखंड) याच्या खून प्रकरणी फोंडा पोलिसानी अटक केलेल्या डेविड टोपी (३६, झारखंड) या संशयीताला न्यायालयाने १० दिवस पोलीस कोठाडीत ठेवण्याचा दिला आदेश.

"पुढील काही दिवसांत अहवाल येण्याची शक्यता" मुख्यमंत्री प्रमोद सावंत

शिरगाव चेंगराचेंगरीचा अहवाल अद्याप आलेला नाही. पुढील काही दिवसांत अहवाल येण्याची शक्यता: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पिकअपच्या वादातून हणजूण येथे टॅक्सी चालकावर हल्ला

हणजूण येथे ग्राहकांच्या पिकअपच्या वादातून झालेल्या संघर्षात वास्को येथील टॅक्सी चालकावर दुसऱ्या स्थानिक टॅक्सी चालकाने हल्ला केला. जखमी टॅक्सी चालकाला ताबडतोब वैद्यकीय उपचारांसाठी शिवोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

तिसवाडी आणि मुरगावात होणार मॉक ड्रील!

गोव्यातही बुधवारी सुरक्षेच्या नजरेतून होणार मॉक ड्रील. पणजी, वास्को,बोगमोळा, दाबोळी विमानतळ परिसरात होणार मॉक ड्रील.मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतांची माहिती.

पोलिस बंदोबस्तात श्री लईराई देवीच्या कौलोत्सवाला सुरवात

पोलिस बंदोबस्तात श्री लईराई देवीच्या कौलोत्सवाला सुरवात. शिरगावात दुपारपर्यंत भाविकांची गर्दी नियंत्रणात. स्टॉल काढले.

गृह मंत्रालायच्या आदेशानुसार मॉक ड्रिल; बैठकीत गोवा मुख्य सचिव सहभागी

गृह मंत्रालयाने (एमएचए) अनेक राज्यांना उद्या ता. 7 मे रोजी प्रभावी नागरी संरक्षणासाठी मॉक ड्रिल आयोजित करण्यास सांगितले आहे. त्यानुसार देशात 259 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे. या बैठकीत गोवा मुख्य सचिव सहभागी झाले.

रिवोणा येथे वाहनांचा अपघात; एक जखमी

रिवोणा येथील जांबावली येथे ट्रक, बस आणि दुचाकी यांच्यातअपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झालाय, त्याला उपचारासाठी मडगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT