गोवा

Goa News: हणजूण पोलीस स्थानकात तणाव; पर्यटकावर प्राणघातक हल्ला आणि गोव्यातील ठळक बातम्या

Marathi Breaking News 29 December 2024: गोव्यातील गुन्हे, राजकारण, क्रीडा, ख्रिसमस, सनबर्न यासह इतर ठळक बातम्या

Akshata Chhatre

सनबर्नमध्ये सहभागी झालेल्या युवकाचा मृत्यू

धारगळ येथील सनबर्न संगीत महोत्सवात २५ वर्षाचा युवकाचा मृत्यू झाला. दिल्लीमधल्या या युवकाच्या मृत्यूचे कारण अजून अस्पष्ट असून शवचिकित्सेसाठी मृतदेह बांबोळी येथे पाठवण्यात आला आहे.

सनबर्न सुरु करण्याआधी आयोजकांचे होमहवन!

आयोजक हरींद्रा सिंग यांच्याकडून होमहवनाव्दारे पहिल्या दिवशी सनबर्नचा शुभारंभ. 'हरींद्रा सिंग हा माझा खूप जुना मित्र. त्याच्या आमंत्रणावरुन माझी हवनाला उपस्थिती. मात्र मी सनबर्नला कधीच जात नाही' फोटोतील माजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कळंगुटकरांचे स्पष्टीकरण.

कळंगुटमध्ये खोट्या आयएएस अधिकाऱ्याला अटक

कळंगुट परिसरात आयएएस अधिकारी असल्याचे भासवून स्थानिकांमध्ये आणि व्यावसायिकांमध्ये भीती आणि संशय निर्माण करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

हणजूण पोलीस स्थानकात तणाव; पर्यटकावर प्राणघातक हल्ला

आसगाव येथील सोरो जंक्शनजवळ अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केल्याने महाराष्ट्रातील नागपूर येथील पर्यटक न्यायाची मागणी करत असल्याने हणजूण पोलिस स्टेशनमध्ये तणाव.

दिल्लीत २ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त; गोव्यातील दोघांना अटक

नवीन वर्षाच्या आधी, दिल्लीत ‘रेव्ह पार्ट्यांसाठी’ गोव्यात पाठवले जाणार २ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, अटक झालेल्या तिघांपैकी दोघे गोमंतकीय.

म्हापसा येथे कामुर्ली रस्त्यावर भीषण अपघात

कामुर्ली म्हापसा येथे झालेल्या एका भीषण अपघातात शिवोली येथील २६ वर्षीय ॲरॉन फर्नांडिसचा मृत्यू झाला आणि रुग्वेद बांदोकर गंभीर जखमी झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT