Atal Setu Dainik Gomantak
गोवा

Atal Setu: अंधार, संशयास्पद हालचाली; अटल सेतूखाली नेमके चालते काय? म्हापसा चोरीतले वाहन सापडल्याने विषय ऐरणीवर..

Atal Setu: म्हापसा येथील चोरीप्रकरणात वापरलेले वाहन अटल सेतूखाली सापडल्याने या ठिकाणचा संशयास्पद वापर पोलिसांच्या निदर्शनास आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अटल सेतूखाली नेमके काय सुरू असते, हा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे पुढे आला आहे. म्हापसा येथील चोरीप्रकरणात वापरलेले वाहन अटल सेतूखाली सापडल्याने या ठिकाणचा संशयास्पद वापर पोलिसांच्या निदर्शनास आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अटल सेतूखाली विशेषतः बसस्थानकाजवळील भागात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर पार्किंग तसेच अनधिकृत व्यवसाय सुरू आहे. सकाळच्या वेळेत काहीजण या ठिकाणी शहाळे विक्री करताना दिसतात, तर रात्रीच्या वेळी येथे अनेकांचा संशयास्पद वावर असतो.

या पुलाखाली सुमारे २५ पेक्षा अधिक बसेस, काही पर्यटक टॅक्सी, तसेच दुचाकी वाहने दीर्घकाळ पार्क करून ठेवण्यात येतात. अंधार, वीज नसणे आणि पोलिसांची नियमित गस्त नसल्याने हा परिसर गुन्हेगारीसाठी पोषक ठरत असल्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.

स्थानिक सूत्रांच्या म्हणण्यानुसार, रात्री उशिरापर्यंत काही व्यक्ती या ठिकाणी थांबलेले दिसतात, तसेच काही व्यवहारही चालतात. प्रकाशयोजना नसल्याने अंधाराचा फायदा घेत विविध बेकायदेशीर हालचाली सुरू असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अटल सेतू हा राजधानीतील अत्यंत महत्त्वाचा दुवा असून, त्याखाली अशाप्रकारच्या अनधिकृत हालचाली सुरू राहिल्यास सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणी नियमित पोलिस गस्त, सीसीटीव्ही यंत्रणा आणि योग्य प्रकाशव्यवस्था आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT