Mapusa police taking action after tourist loot incident  Dainik Gomantak
गोवा

पर्यटक लुबाडणुकीनंतर पोलिसांची मोहीम तीव्र

चंदगडमधील युवकांना मारहाण आणि लुटीप्रकरणी आणखीन तिघा संशयित महिलांना अटक

दैनिक गोमन्तक

म्हापसा : चंदगडमधील पर्यटक युवकांना मारहाण करून त्यांची लुबाडणूक केल्याप्रकरणात म्हापसा पोलिसांनी मंगळवारी (31 मे) आणखीन तिघा संशयित महिलांना अटक केली आहे. या सर्वांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

म्हापसा पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणात पोलिसांनी तिघा महिला संशयितांना अटक केली असून, त्या सर्व नेपाळच्या रहिवासी आहेत. सदर मारहाण व लुबाडणुकीचा हा प्रकार 24 मे रोजी, म्हापसा येथील श्री बोडगेश्वर मंदिरानजीक रस्त्यावर घडला होता. यापूर्वी म्हापसा पोलिसांनी तिघा पुरुष संशयितांना अटक केली होती. ते सध्या पोलिस कोठडीत आहेत. या प्रकरणात या वरील तिघांही महिलांचा समावेश असल्याने पोलिसांना त्यांना अटक केली आहे.

या पिडीत युवक पर्यटकांचे काही नग्न व्हिडिओ करून त्यांना धमकी देण्यात आली होती. दरम्यान, हा प्रकार घडलेल्या त्या आस्थापनांच्या ब्यूटी पार्लरच्या मालकाने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या संशयितांनी पिडीत 11 जणांच्या युवक गटाकडून 1 लाख रोख तसेच एक सोनसाखळी व अंगठी मिळून 1 लाख 80 हजारांचा मुद्देमाल लुटला होता. हा मुद्देमाल अद्याप पोलिसांना सापडलेला नाही आहे.

म्हापशात चंदगडमधील पर्यटक लुबाडणूक प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत आता पोलिसांनी या बेकायदा टाऊट्स विरोधात कारवाई मोहीम सुरू केली आहे. पोलीस उपअधीक्षक जिबवा दळवी यांनी म्हापसा, हणजूण व कोलवाळ या तिन्ही पोलिस स्थानकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील बेकायदा दलाल, फेरीवाले व विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई तीव्र करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशानंतर हणजूण पोलिसांनी आतापर्यंत 10 जण, कोलवाळ पोलिस 3 व म्हापसा पोलिसांनी 7 जणांवर गुन्हा नोंद केला आहे. याशिवाय या भागांतील भाडेकरु पडताळणी मोहीम तीव्र केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

Goa FDA: तीन महिन्यांत 20.43 लाखांचा दंड; 'एफडीए'ची धडक कारवाई, 2,528 अन्न आस्थापनांची तपासणी

Goa Forward Panel: दामोदर कॉलेज विद्यार्थी मंडळ निवडणुकीत 'गोवा फॉरवर्ड'चा झेंडा; चारही प्रमुख जागा पॅनलच्या ताब्यात

VIDEO: देवीची मूर्ती आणताना काळाचा घाला! दुर्गोत्सवाच्या तयारीला गालबोट, भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू; 21 जखमी

SCROLL FOR NEXT