Mapusa Crime  Dainik Gomantak
गोवा

Mapusa Theft: नास्नोडकर ज्वेलर्स चोरी प्रकरणात पोलीसांना यश; चौघांच्या टोळीतील दोघे अल्पवयीन

Mapusa Crime: आरोपींकडून पोलिसांनी 1 किलो सोने आणि 10 किलो चांदीचे दागिने हस्तगत केले

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Jewellers Theft

म्हापसा: म्हापश्यात चंद्रमोहन नास्नोडकर यांच्या मालकीच्या नास्नोडकर ज्वेलर्समधून रविवारी (दि. 22 सप्टेंबर) कोट्यवधी रुपयांच्या वर सोन्याचांदीचे दागिने लंपास करण्यात आले होते. या चोरीच्या संदर्भात महत्वाचे धागे-दोरे हाती लागल्याने पोलिसांचे एक पथक तातडीने मुंबईला रवाना झाले.

या चोरट्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले असून म्हापसा पोलिसांनी चौघांना अटक केली आणि यांमध्ये दोन अल्पवयीनांचा देखील समावेश आहे. संशयित आरोपींकडून पोलिसांनी 1 किलो सोने आणि 10 किलो चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत. हे संशयित राजस्थानमधील असण्याची शक्यता असून त्यांना सिंधुदुर्गात अटक करण्यात आली.

रविवारी मध्यरात्री 12 ते 2 च्या दरम्यान ही चोरी झाली होती. या टोळीमधल्या तिघांनी दुकानामध्ये घुसुन चोरी केली तर चौथा माणूस बाहेरून कोणी येत नाहीये ना यावर नजर ठेऊन होता.

चोरी केल्यानंतर पसार झालेली ही टोळी श्री महारुद्र देवस्थानाजवळ एका हॉटेलच्या CCTV मध्ये टिपली गेली होती. या फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास सुरु झाला होता आणि तिसरे पथक मुंबईला रवाना होण्याआधी बोडगेश्वराच्या चरणी गाऱ्हाणे घालण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT