Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

फेसबुकवर मैत्री, सतरा लाखांच्या चॅरीटीचे आमिष ; म्हापसा येथील व्यक्तीला 4.80 लाखांचा गंडा

अज्ञात व्यक्तीने सतरा लाख रूपये कस्टम विभागाकडे अडकले असल्याचे सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

फेसबुकवर मैत्री झालेल्या मित्राने सतरा लाखांच्या चॅरीटीचे म्हापसा येथील व्यक्तीला आमिष दिले. पण, रक्कम कस्टम खात्याकडे अडकली असून, ती काढण्यासाठी खात्यात पैसे जमा करावे लागतील असे सांगितले. व्यक्तीने चार लाख 80 हजार रूपये खात्यात जमा केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

कुचेली येथील वालेरीयानो आल्मेदा यांची फेसबुकच्या माध्यमातून एका अज्ञात व्यक्तीशी मैत्री झाली. मैत्री झालेल्या व्यक्तीने आल्मेदा यांना सतरा लाख रूपये चॅरीटीच्या माध्यमातून पैसे देण्याचे आमिष दाखवले.

अज्ञात व्यक्तीने सतरा लाख रूपये कस्टम विभागाकडे अडकले असल्याचे सांगितले. पैसे काढण्यासाठी त्यांना चार लाख 80 हजार रूपये जमा करावे लागतील. असेही त्याने सांगितले.

आल्मेदा यांनी अज्ञात व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा केले मात्र, अज्ञात व्यक्तीने चॅरीटीचे पैसे देण्यास नकार दिला. तसेच, घेतलेले पैसे देखील परत करण्यास नकार दिला. 29 ते 31 2023 दरम्यान ही घटना घडली.

आल्मेदा यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहिता 406, 420, व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66-ड अंतर्गत गुन्हा दाखल केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT