Goa: Illegal scrap yard  Dainik Gomantak
गोवा

Mapusa News: करासवाडा येथील अवैध भंगारअड्डा त्वरित हटवा

करासवाडा-म्हापसा येथे बेकायदेशीरपणे कार्यरत असलेला भंगारअड्डा येत्या 15 दिवसांत हटविण्यासंदर्भात म्हापसा पालिकेने संबंधित भंगारअड्ड्याच्या चालकास अंतिम नोटीस बजावली आहे.

दैनिक गोमन्तक

Mapusa News: करासवाडा-म्हापसा येथे बेकायदेशीरपणे कार्यरत असलेला भंगारअड्डा येत्या 15 दिवसांत हटविण्यासंदर्भात म्हापसा पालिकेने संबंधित भंगारअड्ड्याच्या चालकास अंतिम नोटीस बजावली आहे. संबंधिताने या काळात सदर भंगारअड्डा न हटविल्यास पालिकेकडून कारवाई केली जाईल.

आणि याचा सर्व खर्च हा भंगारअड्ड्याच्या चालकाकडून वसूल केला जाईल. सदर बांधकाम हे करासवाडा येथील पीटी शीट क्रमांक 7 आणि चालता क्रमांक 13 मध्ये आहे.

हा बेकायदा भंगारअड्डा मोहम्मद हबीब यांच्या नावाने असून आरजीचे आमदार विरेश बोरकर यांनी या भंगारअड्ड्या विरोधात म्हापसा पालिकेकडे ऑक्टोबर 2022 मध्ये लेखी तक्रार केली होती.

याप्रकरणी पालिकेचे मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर यांच्यासमोर सुनावणी चालू होती. त्यानुसार जवळपास 12 सुनावणीनंतर मुख्याधिकाऱ्यांनी सदर बेकायदेशीर भंगारअड्डा येत्या 15 दिवसांत हटविण्यास सांगितले आहे.

या काळात संबंधिताने तो स्वतःहून न हटविल्यास पालिकेकडून कारवाई केली जाईल आणि याचा खर्च भंगारअड्ड्याच्या चालकाकडून वसूल केला जाणार आहे.

बेकायदा गोष्टी खपवून घेणार नाही

यासंदर्भात आरजीचे अध्यक्ष मनोज परब यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आमदार विरेश बोरकर यांनी याविषयी तक्रार दिली होती. पालिकेकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी हा बेकायदेशीर भंगारअड्डा हटविण्यास सांगितले आहे.

मुळात पालिका तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपल्या शहरातील बेकायदा गोष्टींवर नजर ठेऊन त्यावर कारवाई करण्याची गरज असते. परंतु शहरात तसे होताना दिसत नाही. मात्र आरजीचे कार्यकर्ते अशाप्रकारच्या बेकायदा गोष्टी खपवून घेणार नाही, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT