Bodgeshwar Jatra Dainik Gomantak
गोवा

Bodgeshwar Jatra: बोडगेश्वराच्या जत्रोत्सवात गोबी मंचुरियनच्या स्टॉलला परवानगी नाही! 'हे' आहे कारण

आजपासून जत्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे.

Kavya Powar

Dev Bodgeshwar Jatra: म्हापशातील श्री बोडगेश्वर देवाचा यंदाचा ८९वा महान जत्रोत्सव हा बुधवार (ता.२४) पासून सुरू होत आहे. यंदाच्या तेरा दिवसांच्या जत्रोत्सवातील फेरीत गोबी मंचुरियन स्टॉल्स थाटण्यास परवानगी नसेल, असा एकमुखी ठराव म्हापसा पालिकेने घेतला. तसेच, फेरीतील स्टॉल्सकडून पालिका कचरा संकलनासह प्रती रनिंग मीटर ८०० रुपये सोपो वसूल करणार आहे.

मंगळवारी (ता.२३) म्हापसा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मंडळाची विशेष बैठक झाली. यावेळी उपनगराध्यक्ष विराज फडके तसेच वीसपैकी आठ नगरसेवक हे गैरहजर होते. मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर हे देखील गैरहजर राहिले.

अलीकडच्या काळात जत्रोत्सव किंवा फेरीमध्ये गोबी मंचुरियनचे स्टॉल्स थाटली जातात. मात्र, अनेकदा या व्यावसायिकांकडून कोणतीच आवश्यक स्वच्छता पाळली जात नाही. त्यामुळे अस्वच्छता व आरोग्यास हानिकारक असलेल्या या गोबी मंचुरियनच्या स्टॉल्सना फेरीत यावर्षी परवानगी नसेल. त्याचप्रमाणे, गोबी मंचुरियनची स्टॉल्स थाटल्यास ती म्हापसा पालिकेकडून हटविण्यात येतील, असा एकमुखी ठराव आजच्या बैठकीत घेण्यात आला.

गोबी मंचुरियन स्टॉल्सना बोडगेश्वर देवाच्या जत्रोत्सवाच्या फेरीत परवानगी देऊ नये असा प्रस्ताव नगरसेवक तारक आरोलकरांनी मांडला. त्यास इतर नगरसेवकांनी देखील पाठिंबा दिला. कारण, या स्टॉल्सधारकांकडून स्वच्छतेविषयी आवश्यक खबरदारी घेतल्या जात नाहीत. याशिवाय, जत्रोत्सवस्थळी धुळीचे प्रमाण जास्त असते.

यावर बोलताना नगरसेवक आनंद भाईडकर म्हणाले की, बोडगेश्वर देवस्थान समितीने काही गोबी मंचुरियन स्टॉल्सना तोंडी परवानगी देत, त्यांना जागा दिल्या आहेत. याशिवाय त्यांच्याकडून जागेचे पैसे घेतले आहे. अशावेळी जत्रोत्सवनिमित्त याचा विचार करावा. आणि तसे जमत नसल्यास पालिकेने येऊन ती स्टॉल्स बंद पाडावी याकडे त्यांनी लक्ष वेधले.

यावर नगराध्यक्षांनी सांगितले की, गेल्या मिलाग्रीस फेस्तवेळी म्हापसा पालिकेने गोबी मंचुरियनची स्टॉल्स हटविली होती. याशिवाय आम्हाला लोकांच्या आरोग्याची व स्वच्छतेची काळजी आहे. त्यामुळेच अशा स्टॉल्सना पालिका मंडळाचा आक्षेप असल्याचे त्यांनी सांगितले.

अशावेळी कुणी गोबी मंचुरियनची स्टॉल्स थाटल्यास पालिकेचे कर्मचारी ते हटविणार, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे, स्टॉल्सधारकांकडून पालिका तेरा दिवसांच्या जत्रोत्सवासाठी कचरा संकलनासह प्रती रनिंग मीटर ८०० रुपये सोपो वसूल करणार असे त्यांनी नमूद केले.

नगराध्यक्षांनी सांगितले की, यंदा पालिका जत्रोत्सवतील फेरीमधील स्टॉल्सधारकांना कचराकुंडी देणार नाही. स्टॉल्सधारकांनी स्वतःहून आपला सुका व ओला कचर्‍याचे वर्गीकरणे करावे. त्याचप्रमाणे, प्रभागांतील साफसफाईचे कामगार हे जत्रोत्सवाच्या कामात जंपवू नये, कारण प्रभागांतील स्वच्छतेवर त्याचा परिणाम होतो, याकडे नगरसेविका डॉ. नूतन बिचोलकर व इतर नगरसेवकांनी लक्ष वेधले.

त्यानुसार, बुधवारी नगराध्यक्षा या पालिका पर्यवेक्षकांसोबत बैठक घेऊन कामगारवर्गाचे नियोजन करणार आहेत. आतापर्यंत जत्रोत्सवाच्या फेरीसाठी ६४१ जणांनी स्टॉल्ससाठी अर्ज केल्याची माहिती भाईडकरांनी पालिका मंडळास दिली.

दरम्यान, नगरसेवक तारक आरोलकर, साईनाथ राऊळ, आशीर्वाद खोर्जुवेकर यांनी फेरीस्थळी स्थानिक म्हापसेकरांना प्राधान्य दिले जावे अशी मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stray Dogs Survey: भटक्या कुत्र्यांना दत्तक घेण्याच्या आवाहनाला प्रतिसाद नाही; आता चावणाऱ्या कुत्र्यांचे सर्वेक्षण

Mapusa RTI Fine: माहिती अधिकारातील टाळाटाळ भोवली; म्हापसा पालिकेच्या अधिकाऱ्याला 'इतक्या' हजारांचा दंड

Diwali Travel 2026: 'Goa Trip' महागणार! दिवाळीत गोव्यातील हॉटेल्सच्या दरांत 42% वाढीचा अंदाज; व्हिलाचे भाडे तब्बल 5.8 लाखांवर

Meta Fine 25 Billion Dollars: डेटा प्रायव्हसी प्रकरणात 'मेटा'ला झटका! कोर्टाने ठोठावला 2.36 लाख कोटींचा दंड; सिलिकॉन व्हॅली हादरली

Salaulim Dam Affected People: 40 वर्षांपासून प्रलंबित साळावली धरणग्रस्तांचा प्रश्न सुटणार? मुख्यमंत्र्यांची ग्वाही

SCROLL FOR NEXT