Joshua De Souza Dainik Gomantak
गोवा

उपसभापती जोशुआ डिसोझा यांचे सभागृहात अभिनंदन!

या पदावर बसणाऱ्या व्‍यक्‍तीने पक्षविरहीत काम करणे असे अपेक्षित असते. ज्‍योशुआ हे तरुण आणि धडाडीचे आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: म्‍हापशाचे आमदार ज्‍योशुआ डिसोझा यांची उपसभापतिपदी निवड झाल्‍याबद्दल त्‍यांच्‍या अभिनंदनाचा ठराव आमदार उल्हास तुयेकर यांनी विधानसभेत मांडला. खरे तर उपसभापती हा विरोधी गटाचा असायला हवा.

(Mapusa MLA Joshua D'Souza was elected as Deputy Speaker)

या पदावर बसणाऱ्या व्‍यक्‍तीने पक्षविरहीत काम करणे असे अपेक्षित असते. ज्‍योशुआ हे तरुण आणि धडाडीचे आहेत. ते या पदाला निश्‍चित न्‍याय देतील, असे आमदार विजय सरदेसाई यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, उपसभापती म्‍हणून एक उमदे व्‍यक्तिमत्त्व या सभागृहाला लाभले असून ते या पदाला योग्‍य तो न्‍याय देतील. यावेळी आलेक्‍स सिक्‍वेरा, दिगंबर कामत, माविन गुदिन्‍हो, रोहन खवंटे, नीलेश काब्राल, नीळकंठ हळर्णकर यांनीही विचार मांडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT