Mapusa fish market hygiene Dainik Gomantak
गोवा

Mapusa Fish Market: 'म्हापसेकरांना आणखी संकटात लोटू नये'! म्हापसा पालिकेला मासळी मार्केट अस्वच्छतेवर नोटीस; काँग्रेस करणार स्वच्छता

Mapusa Municipal Council: पालिकेकडून निर्देशांचे पालन न झाल्यास स्थिती पूर्ववत होईपर्यंत मार्केट संकुलाला टाळे ठोकण्याची सूचनाही आरोग्य केंद्राने उपजिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: येथील म्हापसा नागरी आरोग्य केंद्राने मासळी व मांस मार्केटमधील अस्वच्छता स्थितीविषयी म्हापसा पालिकेला अंतिम नोटीस बजावली असून हा उपद्रव सुधारण्याचे निर्देश दिले आहेत.

पालिकेकडून निर्देशांचे पालन न झाल्यास स्थिती पूर्ववत होईपर्यंत मार्केट संकुलाला टाळे ठोकण्याची सूचनाही आरोग्य केंद्राने उपजिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. यासंदर्भात म्हापसा काँग्रेस गटाने शनिवारी (ता. १) म्हापशात पत्रकार परिषद घेत पालिका प्रशासन, सत्ताधारी नगरसेवक व आमदारांवर सडकून टीका केली.

पालिकेला मार्केटची अवस्था सुधारता येत नसल्यास तसे कळवावे. काँग्रेस पक्षाकडून मासळी मार्केट परिसरात स्वच्छता व साफसफाईची मोहीम राबवली जाईल, अशा शब्दांत काँग्रेसने सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. व्यासपीठावर नगरसेवक अ‍ॅड. शशांक नार्वेकर, नगरसेवक सुधीर कांदोळकर, अ‍ॅड. प्रतीक्षा खलप, विजय भिके, नौषाद चौधरी उपस्थित होते.

अ‍ॅड. शशांक नार्वेकर म्हणाले, २०१४ मध्ये मासळी-मांस मार्केट कार्यान्वित झाले. मात्र, या प्रकल्पाला अद्याप आरोग्य विभागाचा ना हरकत दाखला नाही.

उदरनिर्वाह धोक्यात?

अस्वच्छतेच्या कारणावरून म्हापसा मासळी मार्केटला टाळे ठोकले जाऊ शकतात, असे झाल्यास स्थानिक व्यापाऱ्यांचा उदरनिवार्ह धोक्यात येईल आणि मार्केट बंद झाल्यास, इतरत्र व्यापाऱ्यांना सामावून घेण्यासाठी पालिकेजवळ जागा नाही. ही स्थिती टाळण्यासाठी निद्रीस्त पालिकेने आता जागे व्हावे व म्हापसेकरांना आणखी संकटात लोटू नये, असे आवाहन नार्वेकरांनी पालिकेजवळ व लोकप्रतिनिधींजवळ केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: 13 वर्षीय मुलीने गळफास घेत संपवलं जीवन, वडिलांचा शाळेतील विद्यार्थ्यावर गंभीर आरोप; वाचा संपूर्ण प्रकरण

'मृतदेह घरी पोहोचवा, क्लब मालकांकडून आर्थिक मदत मिळवून द्या', मृतांच्या मित्रांचा एल्गार

"मैं नहीं खाउंगा, मोटा हो जाउंगा" जयस्वाल केक घेऊन आला, पण 'हिटमॅन'ने दिला नकार Watch Video

Goa Politics:"सकाळी येतो सांगून तुकाराम आलाच नाही!", RGP प्रमुखांनी काँग्रेसला पुन्हा टाळले? युतीचा 'सस्पेन्स' वाढला

Goa Nightclub Fire: हडफडे नाईट क्लब दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई: चार व्यवस्थापक अटकेत, मालकाचीही चौकशी होणार

SCROLL FOR NEXT