Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: प्राणघातक हल्लाप्रकरणी; संशयितांना पोलिस कोठडी

Goa Crime: गोळजुवे, खोर्जुवे-हळदोणा येथे प्रणव फडते (२३) याच्यावर प्राणघातक हल्ला केल्‍याप्रकरणातील संशयितांना आज म्हापसा न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Crime: गोळजुवे, खोर्जुवे-हळदोणा येथे प्रणव फडते (२३) याच्यावर प्राणघातक हल्ला केल्‍याप्रकरणातील संशयितांना आज म्हापसा न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. हल्‍ल्‍यासाठी संशयितांनी वापरलेली सुरी पोलिसांना अजून मिळालेली नाही.

मात्र संशयित ज्या कारगाडीतून हल्ला करण्यासाठी आले होते, ती गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. दिगंत नाईक (२४, पिलार-तिसवाडी) व उस्मान खान (२९, आगशी-तिसवाडी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना दि. १४ फेब्रुवारी रात्री उशिरा घडली होती. पाच दिवस संशयित फरार होते. त्यांना म्हापसा पोलिसांनी काल सोमवारी मोठ्या शिताफीने अटक केली.

दोन वर्षांपूर्वीचा काढला वचपा

दोन वर्षांपूर्वी ‘सनबर्न’ महोत्सवावेळी प्रणव फडते याने दिगंत नाईक याला मारहाण केली होती. गेल्या १५ फेब्रुवारी रोजी घटनेच्या दिवशी रात्री संशयित आरोपी खोर्जुवे येथे आले होते. तेव्हा ते रस्ता चुकले. वाटेत रस्त्याने चालणाऱ्या युवकाला त्यांनी गाडी थांबवून वाट विचारली. तेव्हा संशयित दिगंत याने प्रणव फ़डतेला ओळखले व गाडीतून उतरून त्यास जाब विचारला. त्‍यानंतर चॉपरने हल्ला चढविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT