Carnival Festival 2024 : म्हापसा अनेक सामाजिक संदेश देत, मंगळवारी म्हापसा शहरात रंगीबेरंगी फ्लोट परेडसह कार्निव्हल उत्साहात साजरा करण्यात आला.
सहभागींनी ‘ड्रंक अँड ड्राईव्ह करु नका, पर्यावरणसह प्राणी वाचवा असे अनेक संदेश दिले. कार्निव्हल परेडची झलक पाहण्यासाठी म्हापसाच्या रस्त्यांवर दुर्तफा मोठी गर्दी दिसून आली.
व्हिवा कार्निव्हलच्या गजरात तरुणांनी वेस्टर्न बीट्सवर व कोकणी गाण्यांवर पाय थिरकले. या मिरवणूकीत रेबिजमुक्त गोवा, कचरा व्यवस्थापन, बायोगॅचिी माहिती देणारा, ड्रंक अँड ड्राईव्ह, पर्यावरणाचे तसेच सागरी संरक्षण व इतर सामाजिक संदेश देणारे चित्ररथांचा समावेश होता.
सुरवातीला ओल्ड आझिलोकडून कार्निव्हल परेडला सुरवात झाली. उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी परेडला बावटा दाखविला.
यावेळी नगराध्यक्षा प्रिया मिशाळ, उपनगराध्यक्ष विराज फडके तसेच इतर नगरसेवक व कार्निव्हल समितीचे पदाधिकारी हजर होते. या मिरवणुकीचा परेडचा मार्ग ओल्ड आझिलो ते टॅक्सी स्टॅण्डपर्यंत होता. परेडमध्ये विदूषक २२, क्लब संस्था १५, कुटुंब १२, स्पॉन्सर १, फन/जंकी १०, पारंपरिक ९ अशा संख्येने सहभाग घेतला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.