Mapusa Bus Stand Dainik Gomantak
गोवा

Mapusa Bus Stand: म्हापसा बस स्थानकावर बस रिव्हर्स घेताना अपघात, वृध्द महिला गंभीर जखमी

महिलेला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Bus Stand: म्हापसा बस स्थानकावर प्रवासी बसचा मोठा अपघात झाला असून, यात एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेच्या पायाला आणि चेहऱ्याला जखम झाल्याची माहिती समोर आलीय. महिलेला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज (दि.22) सायंकळच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हापसा बस स्थानकावर प्रवासी बस मागे घेताना बसच्या मागे असलेल्या एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. महिला मागे असल्याची माहिती चालकास नसल्याने हा अपघात झाला. वृद्ध महिलेच्या पायाला गंभीर जखम झाली असून, तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बस क्रमांक GA 01- Z 8015 ही म्हापसा बस स्थानकावर रिव्हर्स घेताना ही घटना घडली.

म्हापसा बसस्थानकावर नेहमीच खासगी, कदंब प्रवासी बसची वर्दळ पाहायला मिळते. यात स्थानकावर दिवसभर मोठ्या संख्येने प्रवासी ये - जा करत असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT