Digital Fraud Dainik Gomantak
गोवा

Digital Fraud : सावधान ! कष्‍टाचे पैसे सांभाळा; डिजिटल फसवणुकीचा ट्रॅप ओळखा

Digital Fraud : नुकताच, फोंड्यात अशाच प्रकारे अनेकांची मोबाईल अ‍ॅपद्वारे फसवणूक झाल्याचे समोर आले. कमी काळात जास्त परतावा देण्याच्या आमिषापासून सतर्क राहण्याची गरज आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

योगेश मिराशी

म्हापसा डिजिटलायझेशनमुळे जग जवळ आले असून, ऑनलाईन पेमेंट मोड अधिक सुलभ झालेत. मात्र, कधीकधी एका चुकीच्या क्लिकमुळे किंवा अवांछित थर्ड पार्टी अ‍ॅप डाऊनलोड केल्याने आर्थिक अडचणींचा सामना करण्याची वेळ उद्‍भवते.

गोव्यातही ऑनलाईन फसवणूक किंवा फसव्या गुंतवणूक योजनांमुळे अनेकांना आपल्या काबाडकष्ट मिळकतीवर पाणी सोडावे लागले. नुकताच, फोंड्यात अशाच प्रकारे अनेकांची मोबाईल अ‍ॅपद्वारे फसवणूक झाल्याचे समोर आले. कमी काळात जास्त परतावा देण्याच्या आमिषापासून सतर्क राहण्याची गरज आहे.

डोळसपणे विचार करा

१ कमी काळात जास्त परतावा किंवा पैसे मिळविण्याच्या लालसेने गुंतवणूकदार स्कॅमर योजनांकडे आकर्षित होऊन जाळ्यात अडकतात. मुळात, अस्तित्वात असलेल्या बँका किंवा वित्तीय संस्था ठरावीक अमुक दरानेच व्याज देतात, तर नवीन अवतरलेली कंपनी किंवा कुणीही व्यक्ती मोठा परतावा कशी देऊ करते, हा प्रश्न प्रत्येकाला पडला पाहिजे.

२ तसेच अमुक लोक जोडा अन् अधिकचा परतावा मिळावा हे फसवणुकीचे आमिष असते, ही गोष्ट लक्षात ठेवावी. एखादी गाडी किंवा बाईक घ्यायची असल्यास आपण सर्व चौकशी करतो. मग कोणत्याही स्कीममध्ये गुंतवणूक करतानाही केवळ जास्तीचा परतावा मिळतोय, यावर डोळे बंद करून विश्वास ठेवणे कितपत योग्य? डोळसपणे विचार करा.

पोलिसांचा सल्‍ला

सध्या फसवणूक करणारे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवतात. अशातच फुकटचे पैसे आले, हे पाहून अनेकजण बहरतात. मात्र हीच स्कॅमची पहिली पायरी असते. कारण, हे स्कॅमर नंतर फोन करुन पैशांची मागणी करतात.

तसेच संबंधितास बोलण्यात व्यस्त ठेवून, बँकेची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करतात. अशा भामट्यांपासून प्रत्येकाने सावध राहणे गरजेचे.

चुकूनही आपला युपीआय पीन, ओटीपी व पासवर्ड चुकूनही अज्ञात व्यक्तीस शेअर करू नये. याशिवाय, अनोळखी व्यक्ती कोणत्याही लिंकवर किंवा वेबसाईटवर क्लिक करून कोणत्याही वेबसाईटची माहिती भरण्यास सांगत असल्यास युआरएल बरोबर आहे की नाही, हे तपासावे.

मुख्यतः सार्वजनिक व्हायफायचा वापर युपीआयची देवाण-घेवाणासाठी टाळावेच. कारण पासवर्ड हॅक करण्याची जास्त शक्यता असते.

काय खबरदारी घ्याल

योजना देणारी व्यक्ती कोण? ती आपल्या भागात कधीपासून आहे, त्या संस्थेची सरकारी दरबारी नोंदणी आहे की नाही, याचा शोध घ्यावा. अन्यथा हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे अशी आपली अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. याची काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT