Kokan Railway X Social Media
गोवा

Goa Railway: सणासुदीच्या दिवसात ‘प्रवाशां’चे हाल! गोव्याला जोडणाऱ्या अनेक रेल्वे सुरु करण्याची मागणी

South Western Railway: दक्षिण पश्चिम रेल्वेने गोव्याला इतर राज्यांशी जोडणाऱ्या अनेक रेल्वे बंद केल्या आहेत. यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत प्रवाशांचे हाल होत आहेत. याकडे सावर्डे-कुडचडे रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वेचे लक्ष वेधले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

South Western Railway Halts Multiple Goa Trains, Causing Inconvenience

पणजी: दक्षिण पश्चिम रेल्वेने गोव्याला इतर राज्यांशी जोडणाऱ्या अनेक रेल्वे बंद केल्या आहेत. यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत प्रवाशांचे हाल होत आहेत. याकडे सावर्डे-कुडचडे रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वेचे लक्ष वेधले आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनाही सादर केले आहे.

वास्को ते मिरज आणि परत या मार्गावर धावणारी गोमंतक एक्सप्रेस लोहमार्ग रुंदीकरणावेळी बंद करण्यात आली. ती अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. मिरज येथून देशभरासाठी अनेक रेल्वे निघतात. त्यासाठी गोव्यातून रेल्वेमार्गे मिरज येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असायची. ती रेल्वे बंद केल्याने लोकांना रेल्वे पकडण्यासाठी रस्तामार्गे मिरज गाठण्याची वेळ येते. त्यामुळे लोकांचे अतोनात हाल होतात. लोकांचा वेळ व पैसा वाया जातो, याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे.

रेल्वे सुरू करा!

वास्को-विजापूरमार्गे सोलापूर ही रेल्वेही बंद करण्यात आली आहे. गाणगापूर या श्री क्षेत्री जाण्यासाठी या गाडीचा वापर गोव्यातील भाविक आणि प्रवासी करत असत. ती गाडीही विनाविलंब पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी या संघटनेने केली आहे. वास्को ते चेन्नई ही आठवड्याला एकदा धावणारी एक्सप्रेस पुन्हा सुरू करून तिचे नामकरण ‘दूधसागर एक्सप्रेस’ करावे, अशी मागणीही केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT