Goa Covid-19 Updates

 
Dainik Gomantak
गोवा

Goa Covid Update: मुंबईतून बोटीतून आलेल्या प्रवाशांपैकी अनेकजण कोविडबाधित

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी (New Year Celebration) झालेल्या पार्टी, माजमस्ती आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली होती.

दैनिक गोमन्तक

Goa Covid Update: काही दिवसांमागे गोव्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता. तो ओमिक्रॉन (Omicron) रुग्ण आता बराही झाला असल्यामुळे नगरिकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला होता. पण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी (New Year Celebration) झालेल्या पार्टी, माजमस्ती आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे पुन्हा कोरोना (Corona) रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली होती.

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार गोव्यात कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यातच मुंबईतून गोव्यात कॉर्डेलिया बोटीतून आलेल्या 2000 प्रवाशांपैकी अनेकजण कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर येत आहेत. बोटीतील प्रवाशांची चाचणी करून मगच त्यांना गोव्यात सोडण्याचे आदेश गोवा सरकारने (Goa Government) बोट व्यवस्थापनाला दिले आहेत. यामुळे अजूनही गोमंतकीयांवर कोरोनाची टांगती तलवार कायम आहे. याबाबत पुढील काय अधिकृत माहिती सामोर येते, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT