Manohar Parrikar Dainik Gomantak
गोवा

मनोहर पर्रीकरांची बदनामी; काँग्रेसने जाहीर माफी मागावी.. : मुख्यमंत्री

पर्रीकरांच्या आपमानाबद्दल मुख्यमंत्र्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa BJP: विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. गेल्या काही दिवसात प्रमुख राजकीय पक्षांचे केंद्रातील नेते गोव्यात प्रचारासाठी दाखल झाले आहेत. त्यांनी दारोदारी जाऊन आपल्या उमेदवारांसाठी प्रचार केला. प्रचार भाषणामध्ये नेत्यांनी आपल्या विरोधकांवर सणसणीत टीका-टिप्पणी देखील केली.

दरम्यान कॉंग्रेसच्या सभेत दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन (Francisco Sardinha) यांनी भाजपवर निशाणा साधताना स्व. मुख्यमंत्री मनोहर मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजप नेते आणि सध्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी कॉंग्रेसने जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे.

सार्दिन भाषणावेळी म्हणाले होते की, 'माणसाला मरताना सुखाचे मरण यावे अशी आपली इच्छा असते. मात्र मनोहर पर्रीकरांच्या नशिबी ते सुख नव्हते. नाकातून नळया घेऊन त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत काम करावे लागले, कारण त्यांनी फक्त खोटे राजकारण केले. पर्रीकरांनी आणि भाजपने फक्त लोकांना फसवले.'

भाजपतर्फे याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. सध्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या प्रकारची कॉंग्रेसने (Congress) जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. ते म्हणाले की,'गोव्यातील सर्वात उत्कृष्ट नेत्यांपैकी एक मनोहर पर्रीकर यांच्यावर निशाणा साधण्यासाठी काँग्रेसने त्यांच्या निवडणूक प्रचारात अत्यंत दयनीय पद्धतीने टीका केली आहे. राहुल गांधींच्या गोव्यातील रॅलीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या अशा टिप्पण्यांमुळे मी आणि माझे सहकारी गोवावासीय दुखावले आहोत. काँग्रेसने गोव्यातील जनतेची जाहीर माफी मागावी'

यावर कॉंग्रेसची भूमिका पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT