Manohar Parrikar Yuva Scientist Award 2023 Dainik Gomantak
गोवा

Yuva Scientist Award 2023: मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार अर्जासाठी मुदतवाढ, असे करा अप्लाय

युवा वैज्ञानिकांना पाच लाख रूपये बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहेत.

Pramod Yadav

Manohar Parrikar Yuva Scientist Award 2023: गोवा सरकारकडून युवा वैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून युवा वैज्ञानिकांना पाच लाख रूपये बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहेत.

युवा वैज्ञानिक पुरस्कार अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत माहिती देताना राज्यातील युवकांना अर्जासाठी अवाहन केले आहे.

प्रमोद सावंत यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. 'विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमातील प्रतिभा ओळखण्यासाठी आणि गोव्यातील तरुणांमध्ये शाश्वत संशोधन क्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी, मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार 2023 दिला जाणार आहे.'

'यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मी गोव्यातील तरुणांना पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन करतो.'

या पुरस्कारामार्फत पाच लाख रूपयांचे बक्षीस एका वैज्ञानिकाला देण्यात येईल, बक्षीस रकमेची तरतूद दरवर्षी संबधित विभागाच्या अर्थसंकल्पात केली जाणार आहे.

युवा वैज्ञानिक भारतीय नागरिक असावा त्याचे वय 35 पेक्षा अधिक असू नये. विज्ञान - तंत्रज्ञान आणि संशोधन विषयात त्याने काम केलेले असावे आणि एका शास्त्रज्ञाला एकदाच हा पुरस्कार घेता येईल असे सरकारच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

पुरस्कारासाठी असा करा अर्ज

युवा वैज्ञानिक पुरस्कार 2023 साठी इच्छुकांना dstwm.goa.gov.in/yuva-scientist-award/ यावर ऑनलाईन अप्लाय करता येईल. किंवा yuvascientistaward@zerowastegoa.com यावरती ई-मेल करता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT