Sports Minister Govind Gaude on 37th National Games Goa Dainik Gomantak
गोवा

37th National sports Competition: मनोहर पर्रीकर स्टेडियम सामन्यांसाठी सज्ज; क्रीडामंत्री गावडे यांची माहिती

37th National sports Competition: नीरज चोप्रा ‘मशाल वाहक’

दैनिक गोमन्तक

37th National sports Competition: ऑलिंपिक, जागतिक व आशियाई विजेता भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा गोव्यातील ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या २६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उद्‍घाटन सोहळ्यात ‘मशाल वाहक’ असेल. क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी शनिवारी यासंबंधी घोषणा केली.

‘‘राज्यात होणारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा प्रतिष्ठेची असून नीरज चोप्रा या स्पर्धेचा मशाल वाहक असणे गोव्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्याने आमचे निमंत्रण स्वीकारले आहे,’’ असे क्रीडामंत्री गावडे म्हणाले. त्यांनी शनिवारी नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियम संकुलाची पाहणी केली. हे स्टेडियम स्पर्धेसाठी सज्ज असून २१ ऑक्टोबरपर्यंत स्पर्धा आयोजकांच्या स्वाधीन केला जाईल.

नावेलीच्या मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये २३ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत रोलबॉल, ३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर कालावधीत नेटबॉल व ४ ते ८ नोव्हेंबर दरम्यान बास्केटबॉल स्पर्धा होतील अशी माहिती क्रीडामंत्र्यानी दिली.

क्रीडामंत्र्यांनी नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियम संकुलात सराव परिसर, भोजन व्यवस्था, स्वच्छता या संदर्भात पाहणी केली व संबंधितांना सूचना केल्या. नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर या ठिकाणी प्रमुख असतील.

खेळाडूंच्या सराव सत्राला भेट : नावेली येथे सुरू असलेल्या गोव्याच्या बास्केटबॉल व पेनाक सिलाट सराव शिबिराला क्रीडामंत्री गावडे यांनी भेट दिली. खेळाडूंच्या अडचणी, त्यांची कामगिरी जाणून घेतली. शिस्तीचे पालन करत सकारात्मक खेळ करण्याचा सल्ला त्यांनी खेळाडूंना दिला.

गोमंतकीय खेळाडूंना प्राधान्य

स्पर्धेसाठी मूळ गोमंतकीय ७० टक्के आणि ३० टक्के इतर राज्यातील खेळाडू गोव्याच्या विविध खेळांचे प्रतिनिधित्व करू शकतील. ही टक्केवारी असली, तर राज्याच्या संघात सर्वाधिक खेळाडू गोमंतकीय असावेत यासाठी प्राधान्य राहील, अशी माहिती क्रीडामंत्र्यांनी दिली.

खेळाडूंच्या निवासी नियमाबद्दल क्रीडामंत्र्यांनी सांगितले, की ‘‘नवीन नियमांप्रमाणे जे खेळाडू सहा महिन्यांपासुन ज्या राज्यात राहतात, सराव करतात, प्रशिक्षण घेतात, त्यांना राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्या राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी असते.’’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT