Manohar Babu Ajgaonkar Dainik Gomantak
गोवा

Babu Ajgaonkar : "पक्षाने तिकीट दिले नाही तर"... बाबू आजगावकर यांची मोठी घोषणा

मी एक भाजपचा सच्चा कार्यकर्ता आहे : आजगावकर

Rajat Sawant

Pernem News : मी एक भाजपचा सच्चा कार्यकर्ता आहे. पेडणे माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे मी पुढील निवडणुक पेडणे मतदारसंघातूनच लढवीणार असल्याचा पुनुरुच्चार पेडण्याचे माजी आमदार बाबू आजगावकर यांनी केला.

मी पेडण्याचा विकास केला आहे. मी चांगले कर्म केलेले आहे त्याचे फळ मला मिळणारच असेही यावेळी आजगावकर यांनी सांगितले.

बाबू आजगावकर म्हणाले, "मी भाजपचा कट्टर, प्रामाणिक कार्यकर्ता आहे. पेडणे माझी कर्मभूमी आहे. पक्षाने मला तिकीट दिले नाही तरी 2027ची विधानसभा निवडणूक पेडणे मतदारसंघातूनच लढवणार आहे. पक्षाने याबाबतचा निर्णय घ्यावा. पेडणे मतदारसंघात आजच्या घडीला सुरु असलेली कामे आणि माझ्या कार्यकाळातील कामे यामधील फरक तेथील स्थानिकच सांगू शकतात."

"पेडणे तालुक्यात विमानतळ व्हावे यासाठी पंधरा वर्षे दिवस रात्र मेहनत केली. विमानतळ, आयुष हॉस्पिटलची जागा मी मिळवून दिली. आमच्या लोकांना तिथे रोजगार मिळावा यासाठी हे प्रकल्प मी पेडणे मतदारसंघात आणले. प्रकल्पासाठी ज्या लोकांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांच्या मुलांना रोजगाराच्या संधी द्याव्यात अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पेडणे मतदारसंघात वीज, पाणी, रस्ते अशा समस्या होत्या. या समस्या मी मार्गी लावल्याने तेथे विकास झाला. बिनबुडाचे आरोप माझ्यावर करु नयेत. मी मेहनत घेतली आहे. मी तेथे चांगले कर्म केलेले आहे त्याचे फळ मला मिळणारच असा विश्वास यावेळी बाबू आजगावकर यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लिव्ह-इन पार्टनर परतली नवऱ्याकडे, प्रियकराची याचिका फेटाळत कोर्टानं झापलं; म्हणाले, 'अशा नात्यांना कायद्याचं कवच देता येणार नाही'

पाकिस्तानात प्रेम, लग्न अन् भारतात राहून हेरगिरी, एनआयएने जफर रियाजला ठोकल्या बेड्या; आयएसआयचा निघाला हस्तक

Goa Luthra Case: लुथरांच्या जामिनाला सरकारकडून आव्हान; बर्चप्रकरणी खंडपीठात धाव: अजय गुप्तालाही नोटीस, 15 रोजी सुनावणी

Hamza Burhan killed: पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड 'हमजा बुरहान' ठार; मुझफ्फराबादमध्ये अज्ञात हल्लेखोरानं गोळ्या झाडून संपवलं

Pharmacy Strike: इस्‍पितळे वगळता इतर फार्मसी दिवसभर होत्या बंद; 'AIOCD'च्‍या देशव्‍यापी आंदोलनाला गोव्‍यातूनही उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT