Mann Ki Baat 100 Dainik Gomantak
गोवा

'मन की बात कार्यक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद व्हावी', CM सावंत यांची मागणी म्हणाले, 'मोदी शिवाय...'

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांसोबत संवाद साधत असतात.

Pramod Yadav

Mann Ki Baat 100: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांसोबत संवाद साधत असतात. या कार्यक्रमाचा 100 वा भाग आज सर्वत्र प्रसारित झाला. 100 व्या भागासाठी देशातील विविध मान्यवर आणि या कार्यक्रमात वेळोवेळी उल्लेख केलेल्या लोकांना आमंत्रित करण्यात आले. आजचा भाग यशस्वी झाल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी मोठी मागणी केली आहे.

'मन की बात कार्यक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद व्हावी, मला वाटत नाही देशातील कोणत्या पंतप्रधानाने अशा कार्यक्रमाचे शंभर भाग पूर्ण केले असतील. तसेच, या कार्यक्रमाला सर्वाधिक लोकांनी पाहिले देखील आहे.' असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे.

'पंतप्रधान देशातील लोकांशी संभाषण करत भारतातील लोकांच्या आकांक्षांना प्रेरणा देणार्‍या, प्रज्वलित करणार्‍या कथा शेअर करतात. मन की बात हा कार्यक्रम एकतर्फी संभाषण राहिला नसून, ती लोकसहभाग 'स्वयं से समष्टी' चळवळ झाली आहे.' असे सावंत यांनी म्हटले आहे.

प्रमोद सावंत यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गोव्यातून मन की बातच्या 100 व्या भागात सहभागी झालो.

'गोव्याच्या कथा देखील मन की बातच्या विविध भागांमध्ये दिसल्या आहेत. यामुळे गोव्याच्या लोकांना आणि तिथल्या संस्कृतीला व्यासपीठ मिळाले तसचे, त्यांचे जीवनही बदलले आहे. नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाचे 100 भाग पूर्ण केल्याबद्दल, गोव्यातील जनतेच्या वतीने मी पुन्हा एकदा पंतप्रधान यांचे आभार मानतो आणि त्यांचे अभिनंदन करतो.' असे सावंत यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT