Mankurad Mango in Panjim Market Dainik Gomantak
गोवा

Mankurad Mango : मानकुराद अजूनही खातोय ‘भाव’; दर ‘जैसे थै’

5 हजार रुपये डझन; हापूस मात्र तुलनेत स्‍वस्‍त

दैनिक गोमन्तक डिजिटल

Mankurad Mango : राज्याच्‍या बाजारपेठांमध्ये मानकुराद आब्यांचे आगमन होऊन महिना होत आला, परंतु अजूनही तो भाव खातच आहे. 5 हजार रुपये प्रतिडझन दराने तो विकला जातोय. मानकुराद आंब्यासोबतच हापूस आंबाही दाखल झाला असून 2 हजार रुपये प्रतिडझन दराने तो विकला जातोय.

सर्वसामान्य नागरिकांना एवढी रक्कम देऊन आंब्याची चव चाखणे शक्य नसल्याने किमतीत घट होण्याची वाट पाहिली जात आहे. पुढील महिन्यात मोठ्या प्रमाणात आंब्‍याचे उत्पादन वाढेल, त्यावेळी सर्वांना परवडण्यायोग्य दर होईल, असे विक्रेते सांगतात.

पिकलेल्या मानकुराद आंब्यांचे उत्पादन कमी असले तरी मोठ्या प्रमाणात कच्च्या कैऱ्या बाजारात दाखल होत आहेत. आकाराप्रमाणे दरात चढउतार आहे.

उकाड्यामुळे फळांना मागणी

राज्यात उकाडा वाढल्याने अनेक ग्राहक मोठ्या प्रमाणात कलिंगड, मोसंबी, सफरचंद, द्राक्षे तसेच इतर रसदार फळे खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे फळांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. कलिंगडाला इतर फळांच्या तुलनेत अधिक मागणी असल्याचे विक्रेते सांगतात.

10 रुपयांना 2 लिंबे

उष्म्यामुळे लिंबूची विक्री वाढली आहे. अनेक लोक लिंबू सरबत, लिंबू सोडा तसेच ‘क’ जीवनसत्वासाठी लिंबूचा वापर जेवणात वाढला आहे. चांगले मोठ्या आकाराचे लिंबू 10 रूपयांना दोन तर लहान 20 रुपयांना 5 नग असे विकले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jantar Mantar Student Protest: जंतर मंतर छू:मंतर; गांधीवादी मार्गाने जिंकला जंतर-मंतरवरील लढा

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावनिक VIDEO शेअर करत म्हणाला, "मी माझ्या फलंदाजीमध्ये..."

खरी कुजबूज: काँग्रेस विचार बदलणार?

Goa Water Issue: तीन महिन्यांतून एकदा वॉटर मीटर तपासणी सक्तीची! गोवा मानवाधिकार आयोगाचे PWD आणि आरोग्य खात्याला कडक निर्देश

Mapusa Traffic Police: म्हापशाच्या रस्त्यांवरील ट्रॅफिक जॅमला बसणार ब्रेक! 'वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवा!' उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक

SCROLL FOR NEXT