Morjim  Dainik Gomantak
गोवा

Morjim News: तुये आयटीआय परिसरातील रस्ता खोदकाम पंचायतीने रोखले!

Morjim News: परंतु व्यवस्थित काम केले नाही, शिवाय पुन्हा खोदाई सुरू केल्यामुळेच हे काम पंचायतीतर्फे थांबविण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Morjim News:

मोरजी, मांद्रे मतदारसंघासाठी खास ३० एमएलडी पाणी प्रकल्प तुये आयटीआय परिसरात युद्धपातळीवर उभारण्याचे काम सुरू झाले आहे.

त्यासाठी आयटीआय प्रकल्प ते हॉस्पिटलपर्यंतचा मुख्य रस्त्यावर खोदकाम करून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले, पण हे हे काम व्यवस्थित केले जात नसल्यामुळे तुये सरपंच सुलक्षा नाईक यांच्या नेतृत्वाखाली पंचायत मंडळ आणि ग्रामस्थांनी ते काम बंद पाडले.

तुये आयटीआय ते चोपडे पारसेपर्यंतच्या रस्त्याच्या बाजूला खोदकाम करून नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम यापूर्वी करण्यात आले होते. त्यावेळी हे काम व्यवस्थित करण्यात येईल, असे कंत्राटदाराने स्पष्ट केले होते.

परंतु व्यवस्थित काम केले नाही, शिवाय पुन्हा खोदाई सुरू केल्यामुळेच हे काम पंचायतीतर्फे थांबविण्यात आले.

सरपंच सुलक्षा व ग्रामस्थांनी पूर्वीच्या रस्त्यांचे डांबरीकरण होत नाही. तोपर्यंत पुढील रस्ता करू देणार नाही, असा इशारा यावेळी दिला. दिलेले आश्वासन कंत्राटदाराने पूर्ण करावे. आणि नंतरच कामाला सुरुवात करावी. आमदार जीत आरोलकर यांनीही लक्ष घालून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी त्यांना ताकीद द्यावी, अशी मागणी यावेळी सरपंच सुरक्षा नाईक यांनी केली.

यावेळी माजी सरपंच तथा पंच सदस्य नीलेश कांदोळकर पंच सदस्य अनिता साळगावकर पंच मनोहर पेडणेकर स्नेहा नाईक अक्षरा नाईक आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: रोमियो लेन दुर्घटना प्रकरणात गोवा पोलिसांना मोठं यश! फरार आरोपींविरुद्ध 'ब्लू कॉर्नर'चा फास; इंटरपोलकडून नोटीस जारी

इंडोनेशिया हादरलं! जकार्तामधील सात मजली इमारतीला भीषण आग, 20 जणांचा होरपळून मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती VEDIO

Goa Politics: 'आमच्या उमेदवारांची चिंता तुम्हाला का?' सत्ताधारी भाजपला आपने डिवचले

Viral Video: 19 मिनिटांचा 'तो' व्हायरल व्हिडिओ शेअर कराल तर याद राखा, पोलिसांनी दिली तंबी; काय आहे नेमकं प्रकरण?

'रोमिओ लेन'वर बुलडोझर ॲक्शन! मालक फरार होताच CM सावंतांचे फर्मान, पाडकाम पथके सज्ज; कोणत्याही क्षणी होणार भुईसपाट

SCROLL FOR NEXT