Deepak Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Goa politics: मांद्रेच्या जागेवरुन भाजप - मगोप यांच्यात जुंपली; 'बालेकिल्ला कदापि सोडणार नाही', ढवळीकरांचा एल्गार

Sudin Dhavalikar: मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना विचारले असता ते म्हणाले, की मगोपची भाजपशी युती होईल, असे ठरले आहे. सध्या मांद्रेत मगोपचा आमदार आहे.

Sameer Panditrao

पणजी: येत्या विधानसभा निवडणुकीत भले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपचाच उमेदवार असेल, असे जाहीर केले असले तरी मगोपने त्या मतदारसंघावरील दावा न सोडण्याचे ठरविले आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्यापासून मगोपचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ का सोडावा, असा विचार मगोपमध्ये सुरू झाला आहे.

याबाबत मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना विचारले असता ते म्हणाले, की मगोपची भाजपशी युती होईल, असे ठरले आहे. सध्या मांद्रेत मगोपचा आमदार आहे. २०२७ च्या निवडणुकीला अद्याप अवकाश आहे. युतीसाठी बोलणी निवडणूक जवळ आल्यावर होतील. त्यामुळे आताच आम्ही मांद्रे मतदारसंघ सोडणार, असा अर्थ का काढला जावा. कदाचित पेडणे मतदारसंघही आम्हाला मिळेल, असे आम्ही आताच का म्हणावे.

भाजपच्या मंडळ पातळीवरील कार्यकर्ता मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि माजी आमदार दयानंद सोपटे यांच्या उपस्थितीत मांद्रेत येत्या निवडणुकीत भाजपचाच आमदार असेल, अशी घोषणा केली आहे. याचा अर्थ भाजपचा उमेदवार मांद्रेत असेल, असा होतो. मागील विधानसभा निवडणुकीत मगोपचे जीत आरोलकर, भाजपचे दयानंद सोपटे आणि अपक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर अशी तिरंगी लढत झाली होती.

त्यात भाजपच्या मतांची फाटाफूट झाली आणि आरोलकर विजयी झाले. मध्यंतरी आरोलकर हेच भाजपचे पुढील निवडणुकीतील उमेदवार असतील, अशी चर्चा होती. ती चर्चा अद्याप कोणीही जाहीरपणे नाकारलेली नाही. त्यामुळे भाजपचा आमदार कोण, हा विषय स्थानिक पातळीवर चर्चेचा ठरला आहे.

युतीच्या चर्चेवेळी मतदारसंघ ठरवू!

ढवळीकर यांनी सांगितले, की युतीची बोलणी होईल, त्यावेळी प्रत्येक मतदारसंघावर चर्चा होईल. सर्वसाधारणपणे ज्या पक्षाचे जेथे आमदार आहेत, तो मतदारसंघ त्या पक्षाने लढवायचा असे ठरून गेलेले असते. राज्यात परंपरागतरित्या मगोपचे अनेक मतदारसंघ आहेत. त्यासाठी मगोप आग्रही असतो. त्यात निश्चितच मांद्रेचा समावेश होतो.

प्रत्येक राजकीय पक्ष कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आपलाच उमेदवार पुढील निवडणुकीत असेल, असे सांगतो. त्यामुळे मांद्रेविषयी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला आक्षेप नाही. निवडणुकीला बराच वेळ आहे.
दीपक ढवळीकर, अध्यक्ष, मगोप.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT