Sand Mining Dainik Gomantak
गोवा

Sand Mining: गोमंतकीयांच्या घरबांधणीच्या स्वप्नांना मिळणार ‘पंख’! 12 ठिकाणी रेती काढण्यासाठी पर्यावरण दाखले जारी

Mandovi Zuari Sand Mining: खाण खात्याने परवाने जारी केले की पर्यावरण दाखले परवानाधारकांच्या नावावर हस्तांतरित केले जातील, असे प्राधिकरणाला कळविले आहे.

Sameer Panditrao

Mandovi and Zuari river sand mining

पणजी: मांडवी व झुआरी नदीच्या पात्रातून २०१८ नंतर आता प्रथमच कायदेशीरपणे रेती काढता येणार आहे. गोवा राज्य पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरणाने दोन्ही नद्यांमध्‍ये मिळून १२ ठिकाणी रेती काढण्यासाठी लागणारे पर्यावरण दाखले आज जारी केले.

प्राधिकरणाच्या बैठकीत घेतलेल्या या निर्णयाचे इतिवृत्त कायम होण्याची केवळ प्रतीक्षा होती, ‘रेतीचा मार्ग मोकळा’ असे वृत्त सर्वांत आधी ‘गोमन्तक’ने ११ जानेवारी रोजी दिले होते. पर्यावरण दाखल्यांना विलंब होण्‍याचे प्रमुख कारण म्हणजे या दाखल्यांमध्‍ये नोंदविल्या जाणाऱ्या अटींची पूर्तता होते की नाही याची पाहणी कोणी करायची, याबाबत पर्यावरण आणि खाण खात्यात एकमत होत नव्हते.

खाण खात्याने परवाने जारी केले की पर्यावरण दाखले परवानाधारकांच्या नावावर हस्तांतरित केले जातील, असे प्राधिकरणाला कळविले आहे. त्यामुळे परवानाधारकांकडून अटींचे पालन होते की नाही याची पाहणी करण्याची जबाबदारी आता पर्यावरण खात्याला स्वीकारावी लागली आहे. त्यांच्या होकारानंतरच प्राधिकरणाने अर्जांवर विचार केला.

सरकारने आता पारंपरिक पद्धतीने रेतीउत्खननास मंजुरी दिल्याने स्थानिक बाजारपेठेला पुन्‍हा उभारी मिळेल अशी अपेक्षा आहे. रेतीच्या उपलब्धतेत सुधारणा होऊन दरांवर नियंत्रण येईल आणि बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल. राज्यात २०१८ पासून रेती काढण्यास बंदी आहे. राज्य सरकार रेती काढण्याचे परवाने देण्यासाठी प्रयत्नरत आहे. झुआरी व मांडवी नदीत रेती काढण्यास परवाने देण्यासाठी खात्याने १० जानेवारीपर्यंत अर्ज मागविले होते. त्यावर विचार करून आता खात्याकडून रेती काढण्याचे परवाने अर्जदारांना दिले जाणार आहेत.

परवान्‍यासंदर्भात खास बाबी

कोणत्याही इतर व्यक्तीला परवाना सुपूर्द करता येणार नाही.

प्रत्येक झोनमध्ये पाच ते सात परवानेच दिले जातील.

राष्ट्रीय हरित लवाद किंवा पर्यावरण मंत्रालयाच्या कोणत्याही नवीन आदेशाचे पालन करणे.

घरबांधणीच्या स्वप्नांना मिळाले ‘पंख’

राज्यात २०१८ पासून मांडवी आणि झुआरी नदीत रेतीउत्खननास बंदी असल्याने स्थानिक बांधकाम व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. रेतीच्या किमतीत झालेल्या वाढीचा थेट परिणाम बांधकाम खर्चावर होतोय. लहान प्रकल्प, गृहबांधणी आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांची किंमत वाढली, ज्यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिक अडचणीत आले. घरबांधणीच्या स्वप्नावरही पाणी फिरले. मात्र आता हे स्वप्न साकारणे शक्‍य होणार आहे.

पर्यावरणीय अटी आणि शर्ती

उत्खनन फक्त निश्‍चित केलेल्या झोनमध्येच करावे.

कोणत्याही यांत्रिक साधनांचा (जेसीबी, पंप, ड्रेजर) वापर करू नये.

नदीच्या किनाऱ्यांवर प्रदर्शन फलक लावावेत, ज्यावर परवानाधारकाची माहिती असावी.

नदीतील वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये.

उत्खनन करताना सुरक्षा नियमांचे पालन करणे.

रेतीवाहतूक करणाऱ्या वाहनांवर ताडपत्री झाकणे बंधनकारक.

विशेष अटी व नियम

उत्खनन सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळेतच करावे.

पावसाळ्यात (१ जून ते ३० सप्टेंबर) वाळूउत्खननास बंदी.

नदीकिनाऱ्याजवळील वृक्षराजी व इतर पर्यावरणीय घटकांचे संरक्षण करणे.

जीपीएस तंत्रज्ञानाद्वारे वाळू वाहतुकीवर देखरेख ठेवणे अनिवार्य.

प्रत्येक सहा महिन्यांनी नदीच्या तळाच्या खोलीचे मोजमाप करणे.

७० टक्के परवाने पारंपरिक रेतीउत्खनन व्यावसायिकांसाठी राखीव.

नदीच्या दोन्ही काठांपासून किमान २५ मीटर अंतरावर असावे उत्खनन क्षेत्र.

पुलापासून ५०० मीटर अंतरावर रेतीउत्‍खननास बंदी.

नदीतील बेट परिसराजवळ ५० मीटरपर्यंत उत्खननास मनाई.

या ठिकाणी काढता येणार रेती

नदीचे नाव ठिकाण

मांडवी आमोणे जहाज बांधणी उद्योगाजवळ

मांडवी आमोणे गाव

मांडवी बार्जमाल चढउतार करण्‍याचे ठिकाण

मांडवी बेतकी गाव

मांडवी वळवई श्री रामपुरुष मंदिराजवळ

मांडवी सावईवेरे गाव

मांडवी सावईवेरे कणकानजवळ

झुआरी बोरी गाव

झुआरी शिरोडा गाव

झुआरी पंचवाडी गाव (३ क्षेत्रे)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT