Mandar murder case Dainik Gomantak
गोवा

Mandar murder case: जन्मठेपेतील आरोपींची सुटकेसाठी याचिका

Mandar murder case: बाल न्यायालयाने त्यांची मुदतपूर्व सुटका करण्यास हरकत घेतली होती.

दैनिक गोमन्तक

पणजी: मंदार सुर्लकर (Mandar Surlakar) खूनप्रकरणी (Murder Case) जन्मठेपेची शिक्षा झालेल्या चार आरोपींनी त्यांच्या मुदतपूर्व सुटकेसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात (Goa Court) सादर केलेल्या याचिका दाखल करून घेतल्या आहेत. त्यावरील सुनावणी नोव्हेंबर 2021 पर्यत तहकूब करण्यात आली आहे.

आरोपी रोहन धुंगट, जोवितो रायन पिंटो, शेख नफियाझ व शंकर तिवारी याना खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. हे सर्वजन 2005 पासून कोलवाळ कारागृहात शिक्षा भोगत आहेत. राज्य शिक्षा आढावा मंडळाच्या झालेल्या बैठकीत या चौघांना शिक्षेतून मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भातची शिफारस केली होती. ही शिफारस बाल न्यायालयाकडे पाठवण्यात आली होती. बाल न्यायालयाने त्यांची मुदतपूर्व सुटका करण्यास हरकत घेतली होती. या प्रकरणातील साक्षीदारांना आरोपींकडून धोका संभवू शकतो असे निरीक्षण केले होते. त्यामुळे या चौघांनीही वेगवेगळ्या याचिकांद्वारे उच्च न्यायालयात त्याला आव्हान दिले होते.

उच्च न्यायालयासमोर असलेल्या या याचिकांमध्ये मृत मंदार सुर्लकर यांचे वडील दिपक सुर्लकर यांनी हस्तक्षेप अर्ज सादर केला आहे. चारही आरोपींना मुदतपूर्व सुटका करण्यास विरोध केला आहे. राज्य सरकारच्या शिक्षा आढावा मंडळाने शिफारस केल्यानंतर हे प्रकरण फौजदारी दंड संहितेच्या कलम 433 खाली येते. त्यामुळे हे प्रकरण ज्या न्यायालयाने त्यांना शिक्षा दिली त्याच्याकडे पाठवण्याचा प्रश्‍नच येत नाही. त्यामुळे कलम 432 खाली प्रक्रियेची गरज नाही, असा युक्तिवाद याचिकादारांच्या वकिलानी केला. या याचिका दाखल करून घेऊन त्या अंतिम सुनावणीसाठी नोव्हेंबरमध्ये ठेवल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 13 September 2026: बुध-चंद्राचा महासंग्राम! आज 'या' 3 राशींवर ओढवणार मोठे संकट? पैशांचे व्यवहार करताना सावध राहा

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

SCROLL FOR NEXT