Man Drown in Madgaon Dainik Gomantak
गोवा

मडगाव परिसरात मासेमारीवेळी तरुण बुडाला

रविवारपासून तरुण बेपत्ता असल्याची पोलिसांची माहिती

दैनिक गोमन्तक

मडगाव : मडगाव परिसरात मासेमारी करण्यासाठी गेलेला व्यक्ती बुडाल्याची घटना घडली आहे. महेश काकोडकर असं बुडालेल्या तरुणाचं नाव असून तो केपे भागातील रहिवासी असल्याची प्राथमिक आहे. (Man Drown in Madgaon News Updates)

कुंकळ्ळी पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार महेश काकोडकर नावाचा व्यक्ती मासेमारी करण्यासाठी गेला होता. मात्र अचानक तोल गेल्याने पाण्यात पडला. भरती असल्यामुळे तो पाण्यात ओढला गेला आणि बुडाला. ही व्यक्ती रविवारपासून बेपत्ता होती. मात्र सोमवारी त्याचा मृतदेह असोल्णा येथे पाण्यावर तरंगताना आढळला. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) मदतीने मृतदेह बाहेर काढून कुटुंबीयांच्या हवाली केला आहे.

दरम्यान सावर्डेतील एका तरुणाने स्वत:चे जीवन संपवण्याचा प्रयत्न करत एका विहिरीत उडी मारल्याचा प्रकार नुकताच घडला होता. तरुणाने ज्या विहिरीत उडी मारली त्यात पाणी जास्त खोल नसल्याने त्याचा आत्महत्येचा प्रयत्न फोल ठरला. हा प्रकार पाहताच गावकऱ्यांनी तात्काळ अलार्म वाजवला आणि वाळपई (Valpoi) अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांना फोन केला. त्यांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून तरुणाची सुटका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mandovi Bridge Accident: ओव्हरटेक बेतलं जिवावर! मांडवी पुलावर टॅक्सी आणि दुचाकीचा भीषण अपघात; मुंबई आणि रोहतकच्या दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

Horoscope: धनलाभाचे योग आणि जुनी गुंतवणूक ठरणार फायदेशीर! पैशांच्या बाबतीत मंगळवार 'या' राशींसाठी भाग्याचा; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

SCROLL FOR NEXT