Man commits suicide by hanging at canacona Dainik Gomantak
गोवा

चावडी येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या; संबंधित व्यक्ती मुळची कर्नाटकातील

ज्या झाडाला दोरखंड बांधून गळफास घेतला त्या झाडाजवळच पोलिसांना त्यांची बॅग सापडली आहे.

दैनिक गोमन्तक

काणकोण: होन्नावर कर्नाटक येथील अनंत अशोक नाईक(वय 48)यांनी चावडी येथे एका शाळा इमारतीजवळ गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना आज दुपारी उघडकीस आली. ज्या झाडाला दोरखंड बांधून गळफास घेतला त्या झाडाजवळच पोलिसांना त्यांची बॅग सापडली आहे.

(Man commits suicide by hanging at canacona)

त्याचप्रमाणे खिशात आधार कार्डही सापडले आहे. काणकोण पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो वैद्यकीय तपासणीसाठी मडगाव येथील हॉस्पिसियु इस्पितळात पाठवून दिला आहे. प्राप्त माहितीनुसार गेले दोन दिवस मयत चावडी येथे फिरत होता.आज दुपारी काही मुलांना झाडाला मृतदेह लोंबकळत असल्याचे दिसल्यानंतर त्यांनी वडीलधाऱ्यांना याची माहिती दिली. दरम्यान घटनास्थळी पोलिस दाखल झाले. तसेच पोलिसांनी त्याच्या आधार कार्डावरील पत्त्यावर संपर्क साधला आहे. त्याच्या आधार कार्डावर दोड्डमनेकेरी-कुद्रीगे होन्नावर उत्तर कन्नडा असा पत्ता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT