Tarang Devata  Dainik Gomantak
गोवा

Canacona News: लवकरच होणार मल्लिकार्जुन देवाच्या जत्रेला प्रारंभ, देवाच्या तरंगांचे केपेमध्ये झाले स्वागत

9 मार्च रोजी श्री मल्लिकार्जुन देवाची जत्रा होणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona News: गोमंतक ही आध्यात्मिक आणि धार्मिक परंपरांची भूमी मानली जाते. येथील प्रत्येक गावातील प्रथा परंपरा या निरनिराळ्या असून आजच्या ग्लोबलायझेशनच्या युगातही येथील जनता त्यांचे पालन करीत आहे.

गोव्यातील जत्रोत्सव हा मोठा आनंदाचा आणि भव्यदिव्य अशा स्वरूपाचा असतो. गावाच्या ग्रामदैवताची जत्रा (ज्याला शुद्ध मराठीत जागर असं संबोधलं जातं) हा औत्सुक्याचा विषय असतो.

गावडोंगरी काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन देवाच्या जत्रेचे आमंत्रण घेऊन आलेल्या तरंगांचे आज शेल्डे केपे येथे अनिल सावंत देसाई यांच्या घरी स्वागत करण्यात आले.

9 मार्च रोजी श्री मल्लिकार्जुन देवाची जत्रा होणार आहे. त्या जत्रेचे देवाच्या कुळाव्यांना आमंत्रण देण्यासाठी गावचे वेळीप ही तरंगे घेऊन कुळाव्यांच्या घरी येतात.

नेत्रावळी, सांगे, धारबांदोडा, दाभाळ असे मार्गक्रमण करीत आज ती शेल्डे येथे पोहोचल्यावर अनिल सावंत देसाई यांनी त्यांची आरती ओवाळून त्यांचें स्वागत केले.

ही तरंगे घेऊन येणारे वेळीप ती अनवाणी पायांनी घेऊन फिरतात आणि सर्व कुळव्यांच्या घरी भेट देतात. सावंत यांच्या घरी भेट दिल्यावर ती बाळ्ळी येथे रवाना झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT