Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'भाजपला गोवा विकू देणार नाही'! मल्लिकार्जुन खर्गेंची गर्जना, एकीचं केलं आवाहन; काँग्रेसमध्‍ये नवचैतन्‍य

BJP Election Statement Goa: ‘भाजपला निवडणूक जिंकू देणार नाही, गोवा विकू देणार नाही’ अशा जोरदार घोषणा देत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज वेर्णा येथे बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीत नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: ‘भाजपला निवडणूक जिंकू देणार नाही, गोवा विकू देणार नाही’ अशा जोरदार घोषणा देत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज वेर्णा येथे बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीत नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

आजच्या या सभेला कर्नाटकचे कृषिमंत्री नरेंद्र स्वामी, गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी अंजली निंबाळकर, माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन, खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, आमदार कार्लुस फेरेरा, एल्टन डिकॉस्टा तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी खर्गे म्हणाले, की भाजपने देशाचे विभाजन केले आहे. देशाला वाचवायचे असेल तर सर्वांनी आताच एकजूट दाखविण्याची वेळ आली आहे. ‘तोडो और फोडो’ ही भाजपची संस्कृती आहे. जात आणि धर्माच्या आधारे मतांचे विभाजन करून ते निवडणुका जिंकत आहेत. भाजपने देशाचे विभाजन केले आहे आणि आता त्यांना एकसंघतेची ताकद दाखविण्याची वेळ आली आहे. मला पूर्ण विश्वास आहे, की गोमंतकीय जनता यावेळी काँग्रेसला अधिक जागा देईल आणि भाजपला सत्तेतून बेदखल करण्यासाठी मतदान करील.

त्यामुळे उर्वरित देशासमोरही आदर्श निर्माण होईल. त्यापुढे जाऊन त्यांनी काँग्रेस नेत्यांना कानपिचक्या देताना, ‘तुम्ही आपापसांत न भांडता एकी राखा, म्हणजे तुमचे कार्यकर्तेही एकत्र राहतील. तसे झाले तर आजच्या सभेचे जे ‘एकवट’ हे शीर्षक आहे, ते खऱ्या अर्थाने साध्य होईल’, असे बजावले.

शक्तिप्रदर्शनाद्वारे ‘फोडा-तोडा’ राजकारणाविरोधात हाक; रा. स्‍व. संघावरही टीका

पापी इतरांचे शुद्धीकरण काय करणार?

मल्लिकार्जुन खर्गे यांनी, भाजपने उत्तराखंडमध्ये राबविलेल्या शुद्धीकरण मोहिमेवरून भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. ‘जे इतरांना पापी म्हणतात, त्यांनी आधी स्वतःचे शुद्धीकरण करावे’, असे त्यांनी निक्षून सांगितले.

तीन हजार सदस्‍यांची उपस्थिती

वेर्णा येथे ‘एकवट’ या नावाने आयोजिलेल्या बूथ आणि जिल्हा समिती कार्यकर्त्यांसाठीच्या सभेला सुमारे तीन हजार सदस्यांची उपस्थिती होती. प्रत्येक नेत्याने आपापल्या कार्यकर्त्यांना सभेसाठी आणून एकप्रकारे शक्तिप्रदर्शनच केले होते. या सभेला मिळालेला प्रतिसाद एवढा उत्स्फूर्त होता, की कार्यकर्त्यांना घेऊन आलेल्या वाहनांची गर्दी वाढल्याने वाहतूक कोंडीसारखी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा उत्साह जाणवत होता, जो काँग्रेस पक्षाला दिलासा देणारा होता.

‘काळी टोपी'वरून संघावर निशाणा

दाबोळी विमानतळावर खर्गे यांच्या आगमनावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून केलेल्या निदर्शनाबाबत खर्गे म्हणाले, की ‘मी पांढरी टोपी घालतो आणि तिचा रंग मी कधीही बदलू शकतो; पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले काळी टोपी घालतात, जी बदलता येत नाही. जर त्यांना ती बदलायची असेल, तर ती जाळावीच लागेल.

पाटकरांकडूनही खर्गे यांचे स्वागत

अमित पाटकर यांना गोवा प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवून त्याजागी गिरीश चोडणकर यांची नियुक्ती केल्यामुळे पाटकर काहीसे नाराज आहेत, असे बोलले जात होेते. मात्र, आज पाटकर यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना हसतमुखाने सामोरे जात त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dwidwadash Yog 2026: ग्रहांचा राजा अन् देवांचे गुरु एकत्र! 4 राशींवर होणार पैशांचा पाऊस; द्विद्वादश दृष्टी योगाचा मोठा चमत्कार

U20 Asian Cup 2027: दोन दशकांचा दुष्काळ अखेर संपला! 20 वर्षांच्या वनवासानंतर टीम इंडियाची 'एएफसी आशिया कप'मध्ये दिमाखदार एन्ट्री

Aitar Worship Traditional: 'आयतार पूजन' गोवा-कोकणची लोकपरंपरा आणि निसर्गाचं अतूट नातं!

Iran Oman New Route: ट्रम्प यांचा दावा ठरला फुसका फटाका! इराणनं ओमानसोबत हातमिळवणी करत रचला नवा 'गेम प्लॅन'; अमेरिकन जहाजे होणार जप्त?

Porvorim Gun Firing Case: पर्वरी गोळीबार प्रकरण; पोलिसांना चकवा देणारे 'ते' नेमके आहेत तरी कुठे? गोवा पोलिसांची 'स्पेशल टीम' उत्तर-पश्चिम भारतात रवाना

SCROLL FOR NEXT